नॉनव्हेज खायला अनेकांना आवडतं. त्यात जर मासे म्हटलं तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. माश्यांमध्ये ओला जवळा हा प्रत्येकाच्या आवडीचा असतो. हा चविष्ट असण्यासोबत स्वस्त देखील असतो. त्यामुळे हा सर्वसामान्य माणसांना देखील खरेदी करता येतो. ओल्या जवळ्यापासून अनेक पदार्थ बनवता येतात. वांग्याच्या भाजीत ओला जवळा घातल्याने त्याची चव अधिकच वाढते. पण आज आम्ही तुम्हाला जवळ्याची एक भन्नाट रेसिपी सांगणार आहोत, जी कदाचित तुम्ही याआधी खाल्ली नसेल. आम्ही बोलत आहोत ओल्या जवळ्याची भजीबद्दल. भजी खायला प्रत्येकाला आवडते. जर ही भजी ओल्या जवळ्यापासून केली तर ती खायला देखील कुरकुरीत आणि चविष्ट बनते. चला तर मग घरच्या घरी ओल्या जवळ्यापासून कुरकुरीत भजी कशी बनवायची ते जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य:

  • १ वाटी धुतलेला जवळा
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • १ वाटी बेसन
  • १ मोठा चमचा बारीक चिरलेली मिरची
  • १ मोठा चमचा बारीक चिरलेलं आलं लसूण
  • अर्धा मोठा चमचा हळद
  • १ मोठा चमचा लाल तिखट
  • मीठ चवीप्रमाणे
  • पाणी आवश्यकतेनुसार

( हे ही वाचा: वडापाव सोबत दिली जाणारी लाल सुकी लसूण चटणी घरी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी)

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make crispy jawala bhaji at home know easy recipe in marathi gps
First published on: 01-02-2023 at 19:33 IST