Video Shows How To Make Crispy Poha Papdi : पोहे हा घरोघरी बनणारा सर्वात सोपा आणि अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. रविवारी सकाळी मस्त गोल्डन ब्राऊन रंगाच्या परतलेल्या कांद्यावर पसरवलेली पोहे त्यात बारीक बटाट्याचे काप, ओळ खोबरं, कुरकुरीत शेंगदाणे , कोथिंबीर आणि वर लिंबाचा ताजा रस व शेव भुरभुरली की पोटभर आणि मन तृप्त करणारा नाष्टा तयार होतो. पण, तुम्हाला माहिती आहे का पोह्यांपासून तुम्ही कुरकुरीत स्नॅक्स सुद्धा बनवू शकता. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे; यामध्ये एका युजरने पोह्यांपासून कुरकुरीत ‘पोहा पापडी’ बनवली आहे.

साहित्य :

  • पोहे, तेल, जिरे, नायजेला बिया, हिंग, चिली फ्लेक्स, हळद आणि बेसन
  • कस्तुरी मेथी, मीठ, आमचूर पावडर आणि गरम मसाला
  • तेल

कृती :

  • एका बाउलमध्ये पोहे स्वच्छ धुवून घ्या आणि १५ मिनिटे भिजवून ठेवा.
  • नंतर कढईत तेल, जिरे, नायजेला बिया, हिंग, चिली फ्लेक्स, हळद आणि बेसन घालून मंद आचेवर २ मिनिटे भाजून घ्या.
  • त्यानंतर कस्तुरी मेथी घाला आणि एक मिनिट परतून घ्या.
  • त्यानंतर एका ताटात भिजवून घेतलेले पोहे घ्या आणि त्यात हे तयार मिश्रण घाला.
  • नंतर त्यात मीठ, आमचूर पावडर आणि गरम मसाला टाका.
  • त्यानंतर तयार मिश्रण आपण मीठ मळतो त्याप्रमाणे मळून घ्या.
  • हाताला तेल लावा आणि पिठाचे छोटे छोटे गोळे करा.
  • त्यानंतर या गोळ्याला लाटून घ्या आणि व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे त्याला आकार द्या.
  • नंतर तयार पुऱ्या तेलात क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या.
  • अशाप्रकारे ‘पोहा पापडी’ तयार.

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोहे खाण्याचे आरोग्यदायी फायदे –

पोहे हे एक उत्कृष्ट प्रोबायोटिक अन्न आहे. ते आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि फायबर तुमची पचनशक्ती मजबूत करतात. एक प्लेट पोहे खाणाऱ्या व्यक्तीमध्ये लोहाची कमतरता नसते आणि ती अ‍ॅनिमियाच्या आजारापासून दूर राहते. पोह्यामध्ये असणारे कार्बोहायड्रेटस, प्रोटीन, फायबर, व्हीटॅमिन्स आणि आयर्न यामुळे पोहे खाणे हा वजन घटविण्यासाठी उत्तम उपाय ठरु शकतो. तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) @sumiscookingcorner_yt या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.