उन्हाळा जवळ येतोय. हा उन्हाळा येताना काही शारीरिक समस्याही बरोबर घेऊन येतो. यावेळी शरिरातील पाण्याची पातळी कमी होते (डिहायड्रेशन), उष्माघात, डोकेदुखी, घामोळे आणि इतर त्वचेच्या समस्या. यासाठी आपण आहारात काहीतरी थंड खाण्याचा पर्याय शोधत असतो. अशावेळी आपल्या आहारात काकडीचा समावेश नक्की करा. काकडीमध्ये 95 टक्के पाण्याचं प्रमाण असतं. त्यामुळे तुमचे शरीर डिहायड्रेटेड राहण्यास मदत होते. यासोबतच काकडीमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात त्यामुळे आपला चेहरा ताजातवाना राहतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी थंडगार खमंग काकडी रेसिपी घेऊन आलो आहोत. ही खमंग काकडी चवीला अतिशय टेस्टी असून उन्हाळ्याच्या दिवसात खायला खूप छान वाटते. त्यामुळे या खमंग काकडीनं तुमचं जेवण एकदम बेस्ट होईल. चला तर मग पाहुयात कशी बनवायची थंडगार खमंग काकडी.
खमंग काकडी साहित्य –
- पावशेर काकडी
- 1 चमचा दाण्याचा कूट
- 1-2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर
- साखर, मीठ चवीप्रमाणे,
- लिंबू किंवा कैरी
- फोडणीसाठी तूप, हिंग, जिरे
खमंग काकडी कृती –
सर्वात आधी काकडी स्वच्छ धुन घ्या आणि किसून घ्या. त्यानंतर काकडी सोलून बारीक चेचावी, बाजूला आलेले पाणी वाटीत काढून घ्यावे व त्याचा वापर करावा. बारीक केलेल्या काकडीत दाण्याचा कूट, कोथिंबीर आणि मिरची घालावी. त्यानंतर त्यावर अर्धे लिंबू पिळावे किंवा चमचाभर कैरीचा किस घालावा. आता त्यामध्ये मीठ, साखर चवीप्रमाणे घालावे. सगळं मिश्रण आता एकजीव करावं. एकाबाजूला छोट्या कढईमध्ये तूप घेऊन ते गरम झालं की त्यामध्ये हिंग मोहरी आणि मिरची ची खमंग फोडणी करावी. आता ती फोडणी आपल्या मिश्रणामध्ये घालावी.
हेही वाचा – ब्रेकफास्टसाठी परफेक्ट हेल्थी मसूर डाळ वडे, चवही जबरदस्त…जाणून घ्या सोपी रेसिपी
तर आजच ट्राय करुन पाहा ही रेसिपी आणि कशी होते हे आम्हाला नक्की कळवा