थंडीच्या गुलाबी मोसमात गरमागरम गाजराचा हलवा खूप खाल्ला जातो. हिवाळ्यातील या खास पदार्थाचे नाव ऐकताच त्याची चव जीभेवर रेंगाळू लागते. हिवाळ्याच्या हंगामात गरमागरम गाजराच्या हलव्याची चव जबरदस्त लागते. तुम्हीही गाजराचा हलवा तयार करण्याच्या तयारीला लागला असाल तर हलवा करताना काय टाळलं पाहिजे आणि काय आवर्जून केलं पाहिजे, हे एकदा बघूनच घ्या. म्हणजे मग तुमचा गाजर हलवाही होईल एकदम परफेक्ट आणि चवदार

गाजर हलवा साहित्य

२५० ग्रॅम गाजर
१/२ मध्यम आकाराचे बीटरूट
१ कप फुल्ल फॅट मिल्क
१/२ कप साखर
१ टीस्पून वेलची पूड
चिमुटभर मीठ
सुका मेवा आवडीनुसार
१ टेबलस्पून साजूक तूप

गाजर हलवा कृती

१. गाजराचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईत किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये तूप घालून मंद आचेवर ठेवून गरम करत ठेवा.
२. त्यानंतर त्यात किसलेले गाजर घालून ४ ते ५ मिनिटे परतून घ्यावे.
३. किसलेला गाजर छान परतून झाल्यावर त्यात दूध घालून चांगले मिक्स करावे.
४. आता मंद आचेवर शिजवण्यासाठी ठेवा. हे मिश्रण उकळू लागल्यावर गॅस कमी करावा.
५. मंद आचेवर सुमारे १५ ते २० मिनिटे शिजू द्या. पण हे लक्षात ठेवा की हे मिश्रण पॅनला चिकटू नये म्हणून काही वेळावेळाने चमच्याने ढवळत राहा.
६. काही वेळ सर्व मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजू द्या. मिश्रणातील दूध संपूर्ण आटल्यावर त्यात साखर घाला.
७. साखर घातल्यानंतर हलवा आणखी १०-१५ मिनिटे शिजू द्या. म्हणजे साखर व्यवस्थित विरघळून हलवा जाड होईल.
८. काही वेळाने गाजर हलव्यात साखर चांगल्या पद्धतीने मिक्स झाल्यावर त्यात मावा घालून मिक्स करून ५ मिनिटे शिजवावे.
९. आता त्यात वेलची पूड आणि बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घाला. ते चांगले मिक्स करा. हलवा घट्ट होऊन तूप सोडायला लागल्यावर गॅस बंद करा.
१०. आता गरमागरम गाजर हलवा, तुमच्या कुटुंबियांना सर्व्ह करा.

हेही वाचा >> ना गॅस-ना तडका, आवळ्याची करा चमचमीत चटणी; पोट भरेल, केस आणि त्वचाही चमकेल

या टीप्स वापरा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाजर जर खूप कडक असतील, तर गाजराच्या आत असणारा पिवळा, जास्त निब्बर भाग हलवा करण्यासाठी वापरू नका.
हलव्यासाठी वापरण्यात येणारे गाजर कोवळे असावेत. खूप जाडेभरडे नको.
हलव्यासाठी गाजर किसताना मोठ्या किसणीचा वापर करावा.
तुप तापल्यानंतर जेव्हा गाजर कढईत टाकाल, तेव्हा ते ३ ते ४ मिनिटांपेक्षा अधिक शिजवू नका.
साखर टाकल्यानंतर हलवा खूप जास्त शिजवू नये. त्याने तो लगदा होतो.
खूप जास्त दुध टाकणेही चुकीचे आहे. त्यामुळेही हलव्याचा चिखल होतो. दुध कमी टाकून तुम्ही त्याऐवजी खवा देखील वापरू शकता.