सध्या द्राक्षांचा सीजन सुरू झाला आहे. बाजारात हिरवीगार द्राक्षे आपल्याला पाहायला मिळतात. द्राक्षे खायला अनेकांना आवडतात. पण आज आम्ही तुम्हाला द्राक्षाचा लोणचं चटपटीत लोणचं कसं बनवायचं याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आजपर्यंत आपण आंब्याचे, आवळ्याचे, गाजराचे, लिंबाचे अशा अनेक प्रकारची लोणची चाखली असतील. पण कदाचित द्राक्षाचं लोणचं याआधी चाखलं नसेल. द्राक्षाच्या लोणच्याची रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे. अगदी कमी सामानात तुम्ही ही रेसिपी झटपट बनवू शकता. तर जाणून घेऊया द्राक्षाचे लोणचं बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • एक वाटी आंबट गोड द्राक्ष
  • तीन चमचे मोहरीची पूड
  • अर्धा चमचा मेथी
  • अर्धा चमचा लाल तिखट
  • पाव चमचा हळद
  • तीन चमचे बारीक मीठ
  • लिंबाएवढा गूळ
  • फोडणीचे साहित्य
  • तेल
  • मोहरी अर्धा चमचा
  • हिंग अर्धा चमचा
  • हळद अर्धा चमचा

( हे ही वाचा: चहासोबत कुरकुरीत मुगाचे पकोडे खाल तर खातचं राहाल; ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृती

एका भांड्यात पाव वाटी तेलाची मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. गार होऊ द्या. दुसऱ्या भांड्यात द्राक्ष चिरून घ्या. मोहरीची पूड, दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा, बारीक मीठ तीन चमचे, थोडासा गूळ एकत्र करून त्यावर गार झालेली फोडणी ओता. थोड्याशा तेलात अर्धा चमचा मेथी तळून मग ती कुटा व द्राक्षाच्या लोणच्यात घाला. लोणचं दुसऱ्या दिवशी खावं द्राक्ष आंबट नसल्यास अर्ध लिंबू पिळावं.