बऱ्याचदा कोशिंबीर बनवताना त्यात काकडी, गाजर बरोबर बीट सुद्धा आवर्जून घातले जाते. बीट हे पौष्टिक असून याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. पण, बीट खाण्याचा अनेक जण कंटाळा करतात. म्हणून बीटापासून अनेक गृहिणी विविध पदार्थ देखील बनवतात. जर तुमच्याही घरात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत बीट खाण्याचा कंटाळा करत असतील. तर आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. तर आज आपण ‘बीट पराठा’ कसा बनवायचा याची सोपी रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य :

how to make Chana Koliwada Recipe in Marathi
Chana Koliwada : कुरकुरीत ‘चना कोळीवाडा’ कसा बनवायचा माहिती आहे का? मग ‘ही’ सोपी रेसिपी लगेच लिहून घ्या…
Karle Kanda Chivda Recipe In Marathi Chivda Recipe In Marathi
कारले कांदा कुरकुरे चिवडा; कुरकुरीत, खमंग चिवडा करण्याची घ्या परफेक्ट रेसिपी
Chatpata Shevpuri sandwich Write down materials and recipe
काहीतरी चटपटीत खायचंय? मग झटपट बनवा ‘शेवपुरी सँडविच’; लिहून घ्या साहित्य आणि कृती
Shev Paratha Recipe in marathi how to make
मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या घाईत झटपट बनवा शेव पराठा; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Masala Poli Recipe
शिळ्या पोळीपासून झटपट बनवा मसाला पोळी; नोट करा साहित्य आणि कृती
White Onion Pickle recipe in marathi how to make white Onion Pickle in marathi
पांढऱ्या कांद्याचे चटकदार लोणचे; चव इतकी भारी की भाजी- वरणाची गरजच नाही! बघा सोपी रेसिपी
Make harbhrayacha thecha in just five minutes
फक्त पाच मिनिटांत बनवा ओल्या हरभाऱ्याचा झणझणीत ठेचा; लिहून घ्या साहित्य आणि कृती
Gajar Burfi Recipe In Marathi Gajar Burfi Recipe Burfi Recipe in marathi
एकदा खाल्ली की खातच राहावीशी वाटणारी गाजराची बर्फी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
dahikala
लाडक्या कृष्णासाठी बनवा दहीकाला! सोपी आणि झटपट तयार होणारी पौष्टिक रेसिपी, लिहून घ्या
  • पाव किलो बीट
  • हळद
  • मीठ
  • मसाला
  • गरम मसाला
  • धने-जिरे पावडर
  • तेल (तूप किंवा बटर आवडीनुसार)
  • मीठ
  • गव्हाचे पीठ

हेही वाचा…अचूक प्रमाण अन् टिप्ससह बनवा स्वादिष्ट, गुलाबी खरवस ; पाहा रेसिपीचा सोपा VIDEO

कृती :

  • पाव किलो बीट धुवून घ्यायचे.
  • बीटाची साल काढून त्याला कुकरमध्ये उकडवून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात हे उकडलेलं बीट घाला आणि त्यात हळद, मीठ, मसाला आणि गरम मसाला, धने-जिरे पावडर घाला.
  • हे सर्व मिस्करमध्ये बारीक करून घ्या आणि पाणी अजिबात घालू नका.
  • त्यानंतर सर्वप्रथम परातमध्ये गव्हाचे पीठ घ्या त्यात तेल घाला आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं मिश्रण पिठात एकजीव करून घ्या.
  • पाच मिनिटे असंच ठेवा व नंतर या पिठाचे गोळे करून घ्या.
  • त्यानंतर पोळी लाटतात त्याप्रमाणे लाटून घ्या आणि तव्यावर तूप, बटर किंवा तेल या पैकी कोणताही एक पदार्थ वापरून पराठे शेकून घ्या.
  • तुम्ही बीट पराठा टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता.
  • तर अशाप्रकारे ‘बीट पराठा’ तयार.