तुम्ही घरी असाल किंवा ऑफिसमध्ये संध्याकाळी चार नंतर खूप भूक लागते आणि काही तरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. कारण दुपारचं जेवून बरेच तास झालेले असतात आणि रात्रीच जेवण होण्यास बराच वेळ असतो. तर या संध्याकाळच्या वेळेत चहा, मॅगी अशा हलक्या फुलक्या पदार्थांचे आपण सेवन करतो. तर तुम्हाला सुद्धा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी काही तरी चटपटीत खाण्याची इच्छा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसीपीचे नाव आहे टोमॅटो स्टिक. चला तर पाहुयात टोमॅटो स्टिकची सोपी रेसिपी.

साहित्य :

  • दोन कप गव्हाचे पीठ
  • १ कप रवा
  • जिरं
  • काळी मिरी पावडर
  • सहा टोमॅटो
  • तेल
  • मीठ

कृती :

  • सहा टोमॅटो स्वछ धुवून कापून घ्या. नंतर किसणीवर टोमॅटो किसून घ्या.
  • त्यानंतर एक ताट घ्या त्यात चाळणी ठेवून सगळ्यात पहिला गव्हाचे पीठ, रवा चाळून घ्या.
  • नंतर जिरं, काळी मिरी पावडर, किसून घेतलेलं टोमॅटो आदी घालून मिश्रणाचा एक पिठाप्रमाणे गोळा करून घ्या.
  • त्यानंतर या पिठाचे छोटे गोळे करा आणि लाटून घ्या. आणि या लाटलेल्या पोळीचे उभे एकसामान तुकडे करून घ्या.
  • नंतर कढईत तेल घ्या आणि त्यात हे तुकडे कुरकुरीत तळून घ्या.
  • आणि मग एका प्लेटमध्ये सर्व करा
  • अशाप्रकारे तुमचे टोमॅटोचे स्टिक तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @FoodieFemmePooja या युजरच्या युट्युब चॅनेलवरून घेण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा…फक्त पाव किलो बीट वापरा अन् बनवा बीटाचा मऊसूत पराठा; पाहा सोपी रेसिपी