Tasty & Healthy Dosa: आतापर्यंत तुम्ही तांदळाच्या आंबवलेल्या पिठाचे डोसे खाल्ले असतील, पण आज आम्ही तुमच्यासाठी पौष्टीक असे डोसे घेऊन आलो आहोत. हे कडधान्याचे डोसे पौष्टीक आणि चविष्टही होतात. चला तर मग बघुयात कडधान्याचे पौष्टीक डोसे कसे बनवायचे.

कडधान्यांचे डोसे साहित्य :

  • भिजवलेले मिक्स कडधान्य – १ वाटी मटकी, मूग, मसूर (वाटून घ्या)
  • तांदूळ पीठ – अर्धी वाटी
  • ५-६ लसूण पाकळ्या
  • पाणी – पाऊण वाटी
  • मीठ – चवीनुसार
  • १ हिरवी मिरची, कोथिंबीर (वाटून घ्या)
  • अर्धी वाटी दही
  • तेल – गरजेनुसार

कडधान्यांचे डोसे कृती –

  • सर्वपर्थम मोड आलेले कडधान्ये वाटून घ्या त्यात तांदूळ पीठ व दही एकत्र कालवा.
  • नंतर लसूण, मिरची, कोथिंबीरचे वाटण घाला. मीठ व गरजेपुरते पाणी घालून पातळ मिश्रण करून घ्या.
  • मिश्रण मुरल्यानंतर नॉनस्टिक तव्यावर डोसे करा. दही किंवा हिरव्या चटणीबरोबर हे डोसे छान लागतात.

हेही वाचा – पावसाचा आनंद करा द्विगुणीत अन् घरीच बनवा कुरकुरीत कोबी भजी, जाणून घ्या सोपी रेसिपी

ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी होते ते आम्हाला कळवा.