उपवास असला कि साबुदाणा हा आलाच. अनेकांकडे साबुदाण्याची खिचडी होते; तर काही खमंग आणि कुरकुरीत वड्यांचा बेत करतात. मात्र अनेकजण वडे तेलकट असतात म्हणून ते खाण्यास नकार देतात. अशा वेळेस, उपवास नसताना तुम्हाला कधी साबुदाण्याचे वडे खायची इच्छा झाली तर, न तळता कसे बनवायचे ते पाहा.

तसेच साबुदाण्याच्या वड्यांना प्रथिनयुक्त बनवण्यासाठी त्यामध्ये पनीरचा वापर कसा करायचा याची रेसिपी इन्स्टाग्रामवरील herhealthypalate नावाच्या अकाउंटने शेअर केली आहे.

साबुदाण्याचे प्रोटीनयुक्त मिनी वडे रेसिपी :

साहित्य

साबुदाणा
पनीर
बटाटा
भाजलेले शेंगदाणे
मिरच्या
आले
काळे मीठ
गरम मसाला
जिरे
कोथिंबीर
तांदळाचे पीठ
तेल

हेही वाचा : हडप्पा संस्कृतीमध्ये झाला का वांग्याच्या भाजीचा उदय? वाचा शेफ कुणाल कपूरने दिलेली माहिती….

कृती

पूर्वतयारी –

 • सर्वप्रथम वड्यांसाठी साबुदाणा स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावा.
 • आता २ मध्यम आकाराचे बटाटे उकडून, सोलून घ्या.
 • भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट करून घ्या.

वड्यांना सुरवात करू.

 • प्रथम भिजवलेला साबुदाणा एका पातेल्यामध्ये काढून घ्यावा.
 • त्यामध्ये उकडलेले बटाटे कुस्करून घाला.
 • नंतर बारीक चिरलेल्या मिरच्या, जिरे, मीठ, गरम मसाला घालून घ्या.
 • तसेच, शेंगदाण्याचे कूट, तांदळाचे पीठ घालून साबुदाण्याचे सर्व मिश्रण होता चांगले एकजीव करून घ्यावे.
 • दुसऱ्या बाऊलमध्ये, ताजा पनीर कुस्करून घ्यावा.
 • त्यामध्ये हिरव्या मिरच्या, काळे मीठ, जिरे आणि कोथिंबीर घालून घ्या.
 • बाऊलमधील पनीरचे मिश्रण हाताने चांगले एकजीव करून घ्या.
 • या मिश्रणाचे लहान गोळे तयार करा.
 • आता साबुदाण्याच्या तयार केलेल्या मिश्रणाचे मध्यम आकाराचा चपटा गोळा बनवून घ्या.
 • त्यामध्ये पनीरच्या गोळ्याचे मिश्रण भरून, साबुदाण्याचा गोळा बंद करून घ्या.
 • आता एक आप्पे पात्राला अगदी थेंबभर तेल लावून पात्र गरम करून घ्या.
 • त्यामध्ये आपण तयार केलेले साबुदाण्याचे मिनी वडे चांगले सोनेरी होईपर्यंत शिजवून घ्या.
 • एक बाजू खरपूस सोनेरी झाल्यावर वड्याची दुसरी बाजूदेखील त्याच पद्धतीने खमंग करून घ्यावी.
 • तयार झालेले प्रोटीनयुक्त मिनी साबुदाणा वडे चटणीबरोबर खाण्यास द्यावे.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @herhealthypalate नावाच्या अकाउंटवरून ही भन्नाट रेसिपी शेअर झाली आहे. या रेसिपी व्हिडीओला आत्तापर्यंत ३.५ मिलियन्ट इतके व्ह्यूज मिळाले आहेत.