ganesh utsav 2023 गणेशोत्सव हा सण जल्लोशाचे,चैतन्याचे आणि ऊत्साहाचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात तर हा सण खुप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. घरोघरी फुलांची आरास सजलेली असते. धूप-दीपांचा सुगंध दारोदारी दरवळत असतो. यावेळी बाप्पासाठी नैवेद्य, प्रसाद बनवला जातो. आज आम्ही तुम्हाला प्रसादासाठी रव्याची बर्फी कशी करायची हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.

साहित्य –

  • वाटीभर रव्याची करा मऊसूत बर्फी
  • रवा
  • तूप
  • साखर
  • पाणी
  • सुकं खोबरं
  • वेलची पूड

कृती –

  • सर्वप्रथम, कढईत ३ चमचे तूप घाला. तूप विरघळल्यानंतर त्यात एक वाटी रवा घालून भाजून घ्या.
  • रवा खरपूस भाजून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यानंतर कढईत एक वाटी साखर घाला.
  • नंतर ग्लासभर पाणी घाला. पाण्यात साखर विरघळल्यानंतर त्यात भाजलेला रवा घालून मिक्स करा.
  • नंतर त्यात एक कप किसलेलं सुकं खोबरं आणि अर्धा चमचा वेलची पूड घालून चमच्याने मिक्स करा.
  • मिक्स करून झाल्यानंतर, एका ताटाला चमचाभर तूप लावून ग्रीस करा. व त्यात तयार मिश्रण घालून पसरवा.
  • त्यावर चिरलेला सुका मेवा घालून गार्निश करा. मिश्रण थंड झाल्यानंतर सुरीने वड्या कापून घ्या.

हेही वाचा >> Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीला बाप्पासाठी बनवा खास खजूर लाडू, १० मिनिटांत होतील तयार

  • अशा प्रकारे चविष्ट रवा बर्फी खाण्यासाठी रेडी.