सध्या अनेक मंडळी तंदुरुस्त राहण्यासाठी पोळी, ब्रेड असे पदार्थ खाण्याचे टाळून भाकरीचे सेवन करणे अधिक पसंती दाखवू लागले आहेत. भाकरी या पदार्थामध्ये पोळीप्रमाणे ग्लुटेन नसते. ज्यांना ग्लुटेनचा त्रास होतो, त्यांच्यासाठीदेखील भाकरी खाणे हा अत्यंत पौष्टिक पर्याय आहे असेही म्हंटले जाते. परंतु, कामावर जाणाऱ्या व्यक्तीला दररोज भाकऱ्या थापून डब्यात घेऊन जाणे थोडे कष्टाचे आणि वेळ खाणारे वाटते.

तसेच अनेकांना मऊ लुसलुशीत भाकऱ्या करायला जमतातच असे नाही. आता या भाकऱ्यांमध्येही तांदळाच्या भाकरीपेक्षा ज्वारी आणि बाजरीची भाकरी करण्यास तशी सोपी असते. एखाद्या व्यक्तीला सवय नसल्यास हाताने भाकरी थापून बनवणे थोडेसे अवघड जाऊ शकते. मात्र, युट्यूबवरील @homecook9049 चॅनेलने तांदळाची भाकरी, पोळीप्रमाणे कशी लाटून बनवावी याची अतिशय साधी-सोपी ट्रिक एका व्हिडीओमधून दाखवली आहे. त्यानुसार पोळपाटावर लाटून तांदळाची भाकरी कशी बनवायची ते पाहा.

हरी वाचा : Recipe : ‘अशा’ पद्धतीने बनवून पाहा गाजराचे चटपटीत लोणचे; काय आहे प्रमाण जाणून घ्या

तांदळाची भाकरी कशी बनवावी

साहित्य

तांदळाचे पीठ
मीठ
पाणी

कृती

  • सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये पाणी घ्या.
  • गॅसच्या मध्यम आचेवर पाणी तापवत ठेवा.
  • त्यामध्ये चवीपुरते, चिमूटभर मीठ घालावे.
  • पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये तांदळाचे पीठ घालून घ्या.
  • आता एका चमच्याच्या साहाय्याने पीठ सतत ढवळत राहा.
  • आता पातेल्यावर झाकण ठेऊन, पिठाला एक वाफ काढून घ्या.

हेही वाचा : संकष्टी चतुर्थी विशेष साबुदाण्याची खीर; उपवासाच्या दिवशी बनवा ही खास गोड रेसिपी…

  • गॅस बंद केल्यानंतर पातेल्यामधील तांदळाची तयार उकड चमच्याच्या मदतीने एकजीव करावी.
  • उकड थोडी गार झाल्यानंतर एका ताटलीमध्ये किंवा परातीत एकजीव केलेली तांदळाची उकड मळण्यासाठी काढून घ्यावी.
  • हाताला थोडे-थोडे पाणी लावत भाकरीसाठी उकड मळून घ्यावी.
  • तयार पिठाची भाकरी लाटण्यासाठी गोळे करून घ्या.
  • आता पोळपाटावर अगदी दररोज पोळ्या लाटतो, त्याप्रमाणे हलके पीठ लावून या तांदळाची भाकरी लाटून घ्यावी.
  • लाटून तयार केलेली भाकरी तव्यावर टाकून, त्यावर थोडे पाणी शिंपडून घ्यावे.
  • हलक्या हाताने भाकरी पलटत राहावी.
  • तव्यावरची भाकरी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजल्यानंतर आणि टम्म फुगल्यानंतर एका डब्यात किंवा एका टोपलीत काढून घ्यावी.

तुम्हाला उकड काढायची नसल्यास अजून एक ‘शॉर्टकट’ पाहा.

तांदळाचे पीठ एका बाऊल किंवा परातीत घेऊन, त्यामध्ये कडकडीत वा कोमट पाणी घालून घ्या.
त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून तांदळाचे पीठ भाकरीसाठी मळून घ्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युट्यूबवरील @homecook9049 या चॅनेलने शेअर केलेल्या व्हिडीओवर आत्तापर्यंत ६३ हजार ८४२ इतके व्ह्यूज मिळाले आहेत.