Video Shows How To Make Tomato Cha Saar : भारतीय आहारात टोमॅटोला महत्त्वाचे स्थान आहे. त्याचा लाल भडक रंग आणि आंबट गोड चवीमुळे तो विविध भाज्या, सलाडसह अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. उन्हाळ्यात भाजी काय बनवायची हा प्रश्न पडला तर आपण टोमॅटोपासून स्पेशल सूप, चटणी, भाजी असे अनेक पदार्थ देखील बनवतो. तसेच नेहमी वरण, आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर हा झणझणीत टोमॅटो सार एखादा घरी बनवून बघा…

टोमॅटोचा सार बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Tomato Saar Recipe Ingredients ) :

  • ३ टोमॅटो
  • ५ लसूण
  • १ हिरवी मिरची
  • २ चमचे नारळाचा किस
  • १ चमचा लाल मिरची पावडर
  • १/४ चमचा हळद
  • १ चमचा धणे पावडर
  • १ चमचा मीठ
  • २ चमचा तेल
  • २ चमचा मोहरी
  • १/२ चमचा जिरे
  • १/४ चमचा हिंग
  • कढीपत्ता
  • धणे पाने
  • चिंच

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टोमॅटोचा सार बनवण्यासाठी लागणारी कृती (How To Make Tomato cha Saar) :

  • सगळ्यात पहिला टोमॅटोचे छोटे-छोटे तुकडे करा.
  • त्यानंतर टोमॅटो हे तुकडे गरम पाण्यात घाला आणि व्यवस्थित शिजवून घ्या.
  • थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात हे तुकडे घाला आणि त्यात हिरवी मिरची, लसूण, नारळाचा किस, लाल मिरची पावडर, हळद, धणे पावडर, चिंच घाला आणि बारीक करून घ्या.
  • त्यानंतर पॅनमध्ये तेल घ्या मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, धणे टाकून मस्त फोडणी द्या आणि त्यात मिक्सरमध्ये बारीक केलेले टोमॅटोचे मिश्रण घाला, थोडं पाणी सुद्धा घालू शकता. नंतर वरून कोथिंबीर घाला.
  • हा टोमॅटोचा सार तुम्ही भाताबरोबर देखील खाऊ शकता.
  • सोशल मीडियावर हा व्हिडीओ @udaipur_food_zone या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.