scorecardresearch

गव्हाचा डोसा लय भारी, चपाती खाणे विसरून जाल, मग एकदा पाहाच डोसा बनवण्याची सोपी रेसिपी

गव्हाचा डोसा बनवण्याची साधी आणि सोपी रेसिपी एकदा पाहाच.

Wheat Dosa Recipe
गव्हाचा डोसा कसा बनवायचा? (Image-Social Media)

आपण नेहमी आपल्या आहारात तांदळाची भाकर, ज्वारीची भाकर, बाजरीची भाकरी किंवा गव्हाच्या चपातीचा समावेश करतो. कारण या भाकऱ्यांचं सेवन केल्यावर शरीराला अनेक फायदे होतात. पण गव्हाच्या पिठापासून बनवण्यात येणारे सर्व पदार्थ हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. कारण गव्हाच्या चपात्या खाल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर व्होल ग्रेन्स शरीराला मिळतात.

पण आज आम्ही तुम्हाला चपात्यांपेक्षाही चविष्ट डोसा कसा बनवायचा याबाबतची रेसिपी सांगणार आहोत. गव्हाचा (कणकेचा) डोसा कसा बनवायचा याची सोपी आणि साधी रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी समजून घेतल्यावर तुम्ही गव्हाचा डोसा बनवल्यावर चपाती खाणे विसरून जाल, यात काही शंका नाही. कारण गव्हाचा डोसा इतका चविष्ट असतो की, तो खाल्ल्यावर पुन्हा एकदा ताव मारण्याची इच्छा होते.

साहित्य – गव्हाचं पीठ-१/२ कप, रवा-१/२ कप, तांदळाचं पीठ २ टेबलस्पून, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी, आवश्यकेनुसार तिळचं तेल

नक्की वाचा – ओठाने तुटेल अशी मऊ भाकरी कधी खाल्ले का? ही सोपी रेसिपी पाहा अन् ताव मारून बघा

कृती – एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये गव्हाचं पीठ, रवा आणि तांदळाचं पीठ आणि मीठ एकत्र करा. त्यामध्ये हळूहळू पाणी घाला आणि चांगलं फेटा. पीठ किमान अर्धा तास तसंच ठेवावं. लोखंडी तवा गरम करा आणि त्यावर तिळाचं तेल लावून घ्या. पातळ डोसा बनवण्यासाठी तव्यावर एक डाव मिश्रण पसरवा. त्यावर थोडं तेल शिंपडा आणि बाजू थोडी खरपूस झाली की उलटा. दुसऱ्या बाजूनंही शिजवा. नारळाची चटणी किंवा सांबारबरोबर गरमा गरम सर्व्ह करा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-02-2023 at 19:59 IST

संबंधित बातम्या