दाक्षिणात्य खाद्यपदार्थांची जितकी माहिती मिळल तितकी कमीच आहे, विशेषत:जेव्हा येथे तयार केल्या जाणाऱ्या स्वादिष्ट चटण्याचा विषय येतो. दक्षिण भारतात लोक चटणीच्या नावाखाली अनेक प्रयोग करतात असं म्हटलं तर त्यात काही वावग ठरणार नाही. तुम्हाला येथे लसून -आल्यापासून नारळापर्यंतच सर्व प्रकारच्या चटणी खायला मिळतील.
बटाटा ही एक अशी भाजी आहे, जे चाटपासून बर्गरपर्यंत प्रत्येक गोष्टीत वापरली जाते. काही लोकांना बटाटे खायला इतके आवडतात की रायतापासून चटणीपर्यंत सर्व गोष्टीत बटाटा वापरतात. आता तुम्ही विचार करत असाल की, बटाट्याचीही चटणी असते का? तर हो असते. ही चटणी मुख्यतः दक्षिण भारतात केली जाते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही याला देसी टच देखील देऊ शकता. दक्षिण भारतीय शैलीत बटाट्याची चटणी कशी करायची हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आमचा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल.
बटाट्याची चटणीसाठी साहित्य
२ मोठे कांदे
२ टोमॅटो
३-४ मोठे बटाटे
४ लसूण पाकळ्या
२ लाल मिरच्या
१ छोटा चमचा लाल तिखट
१/२ कप पाणी
चवीनुसार मीठ
१/२ छोटा चमचा तेल
१/२ छोटा चमचा तीळाचे तेल
१/२ छोटा चमचा मोहरी
१ कढीपत्त्याचा लहान शेंडा
हिंग- एक चिमुट
हेही वाचा- कुरकुरीत डाळीचे धिरडे खाण्याची इच्छा होतेय? ही घ्या सोपी रेसिपी
बटाट्याची चटणी कशी बनवायची?
प्रथम बटाटे, कांदे आणि टोमॅटो चांगले धुवून घ्या. लसूण सोलून बारीक चिरून घ्या. तसेच, कांदा आणि टोमॅटोचे लहान तुकडे करा.
मूठभर कांदे बाजूला ठेवा. आता या तिन्ही गोष्टी मिक्सरमध्ये टाकून चांगले बारीक करा. कढईत १/२ चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवा.चिरलेला कांदा गरम तेलात पारदर्शक होईपर्यंत तळा. आता त्यात कांदा, टोमॅटो आणि लसूण पेस्ट मिक्स करा. ही पेस्ट थोडा वेळ शिजू द्या. कच्च्या टोमॅटोचा वास काही वेळातच निघून जाईल. आता चिरलेल्या बटाट्यासोबत १/२ कप पाणी घाला आणि बटाटे थोडे मऊ होईपर्यंत शिजवा. शेवटी चवीनुसार मीठ आणि तिखट घाला. बटाटे शिजत असताना, ½ टीस्पून स्वयंपाकाचे तेल, ½ टीस्पून तीळाचे तेल, ½ टीस्पून मोहरी, कढीपत्ता आणि हिंग दुसऱ्या पॅनमध्ये गरम करा.आता हे सजावटीसाठी चटणीवर ओता. बटाट्याची चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही दक्षिण आणि उत्तर भारतीय पदार्थांसोबत सर्व्ह करू शकता.
Weekend Special: आता घरीच बनवा केटो स्टाइल चिकन लॉलीपॉप! झटपट होईल तयार, सोपी आहे रेसिपी
या गोष्टी लक्षात ठेवा
- जर तुम्हाला चटणीची चव वाढवायची असेल तर तुम्ही त्यात सांबार पावडर देखील घालू शकता.
- बटाटे जास्त शिजवू नका, कारण ही चटणी फक्त कमी शिजवलेल्या बटाट्यापासून बनवली जाते. नाहीतर, तुम्ही बटाट्याची भाजी खात आहात असे तुम्हाला वाटेल.
- जर तुम्हाला मसालेदार जेवण आवडत असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट घालू शकता.
- जर तुमच्याकडे तिळाचे तेल नसेल तर तुम्ही त्याऐवजी दुसरे स्वयंपाकाचे तेल देखील वापरू शकता. त्यामुळे चवीत फारसा फरक पडत नाही.
- तुम्हाला हवे असल्यास ही चटणी तुम्ही उकडलेल्या बटाट्यानेही बनवू शकता. अट अशी आहे की बटाटे जास्त शिजवलेले नसावेत.