महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. तोच न्याय खाद्यसंस्कृतीलाही लागू होतो. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण. मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, लोणची, पापड, भजे, बोन्डे यांचे अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात. चला तर मग आज बनवुया आजीच्या सोप्या पद्धतीने बनवा खानदेशी स्पेशल खमंग कुरकुरीत दाल बट्टी, ही घ्या सोपी रेसिपी
दालसाठी साहित्य
- ५० ग्राम तुर डाळ
- २५ ग्राम मुग डाळ
- १ टेबलस्पून तेल
- १/४ टीस्पून हिंग
- १ टेबलस्पून जीरे
- १ टेबलस्पून मोहरी
- १ कांदा
- ३ टेबलस्पून शेेंगदाणे
- ७-८ लसूण पाकळ्या
- १ टेबलस्पून मीठ
- १ टेबलस्पून तिखट
- १ टीस्पून हळद
- ७- ८ आमसुल
- २ टेबलस्पून गुळ
बाटीसाठी साहित्य
- १५० ग्राम गव्हाचे पीठ
- ५० ग्राम रवा
- १ टेबलस्पून ओवा
- १/३ टीस्पून सोडा
- १ टीस्पून मीठ
- १ टेबलस्पून तेल
- ७-८ कढीपत्ता
- ३ टेबलस्पून कोथिंबीर
- १ वाटी तळण्यासाठी तेल किंवा तूप
दाल बाटी कृती
स्टेप १
दाल साठी..कुकर मध्ये दोन्ही डाळी, हिंग व पाणी घालून तीन शिट्ट्या करुन शिजवून घ्यावे.
स्टेप २
एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे, मोहरी कढीपत्ताची फोडणी करावी. लसूण, कांदा व शेंगदाणे परतून घ्यावे व त्यात तिखट, हळद व मीठ घालून डाळ मिक्स करावी.
स्टेप ३
वरणला थोडी उकळी आल्यावर त्यात भिजवलेले आमसुल व कोथिंबीर घालून ऊकळी आणावी व दाल तयार करून घ्यावी.
स्टेप ४
बाटी करता गव्हाच्या पिठात ओवा, सोडा, मीठ व तेल घालून मऊसर कणिक मळून १०मिनिटे बाजूला ठेवावे. नंतर त्याचे लहान लहान गोळे करून इडली पात्रात त्यांना बारा ते पंधरा मिनिटे वाफवून घ्यावे.
हेही वाचा >> खानदेशी पद्धतीचे मऊसूत व झणझणीत वांग्याचे भरीत; सोपी रेसिपी तेही घरच्या घरी!
स्टेप ५
तयार बाटीला थंड करून त्याचे चौकोनी कट करून तेलात किंवा तूपात खरपूस तळून घ्यावे. तयार बाटी आंबट-गोड डाळीबरोबर गरम गरम सर्व्ह करावी.