scorecardresearch

Premium

खानदेशी पद्धतीचे मऊसूत व झणझणीत वांग्याचे भरीत; सोपी रेसिपी तेही घरच्या घरी!

खानदेशी पद्धतीचे वांग्याचं भरीत हे फक्त महाराष्ट्रातच नाही , तर उत्तर भारतातही खूप मनापासून खाल्लं जातं.

Khandeshi Vangyache Bharit Recipe In Marathi
खानदेशी पद्धतीचे मऊसूत व झणझणीत वांग्याचे भरीत (Photo: Cookpad)

Khandeshi Bharit Recipe : खानदेशाची वांग्यांचं भरीत खूप फेमस आहे. भरीताचे वांगे बाराही महिने तयार केले जाते पण हिवाळ्यात हे अजून चविष्ट लागते. त्यात हिरव्या पातीचा कांदा ,हिरव्या पातीच्या लसणाचा वापर केला तर हे भरीत अजून चविष्ट होते तर बघूया खानदेशी पद्धतीचे वांग्याचं भरीताची सोपी रेसिपी.

खानदेशी पद्धतीचे वांग्याचं भरीत साहित्य

Premachi Goshta fame actress Mrunali Shirke owns a bakery business
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील ‘ही’ अभिनेत्री अनेक वर्षांपासून करते घरगुती व्यवसाय, व्हिडीओ व्हायरल
kitchen jugaad stick bindi paper on gas cylinder
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
aishwarya narkar dances on famous song of madhuri dixit
Video : माधुरी दीक्षितच्या लोकप्रिय गाण्यावर ऐश्वर्या नारकरांचा जबरदस्त डान्स, पतीसह नेटकऱ्यांनी केल्या खास कमेंट्स
Vangyache Bharit Recipe
Vangyache Bharit : वांग्याचे कोरडे भरीत कसे बनवायचे? जाणून घ्या, ही रेसिपी लगेच नोट करा
 • जळगाव भरीत वांगे
 • कांद्याच्या पात
 • २ टेबलस्पून हिरव्या पातीच्या लसणाची पेस्ट
 • २-३ हिरव्या मिरच्या
 • ५-६ कढीपत्त्याची पाने
 • २ टेबलस्पून शेंगदाण्याचे भरड
 • १ टीस्पून स्पून हळद
 • चवीनुसार मीठ
 • कोथिंबीर आवडीनुसार
 • २ टेबलस्पून तेल
 • १ टीस्पून मोहरीचे

खानदेशी पद्धतीचे वांग्याचं भरीत साहित्य कृती

स्टेप 1
सर्वात आधी वांग्याला तेल लावून मधून कट करून वांगे भाजून घेऊ

स्टेप 2
नंतर वांग्याची साल काढून वांगे कुस्करून घेऊ बाकीचे सगळे तयारी करून घेऊ लसणाच्या पातीची पेस्ट करून घेऊ

स्टेप 3
कढईत तेल तापून फोडणी करून घे मोहरीची रे तडतडल्यावर त्यात हिरव्या मिरच्या कढीपत्ता लसूण परतून घेऊ कांद्याची पात परतून घेऊन

स्टेप 4
शेंगदाण्याची भरड टाकून परतून घेऊ नंतर हिरव्या पातीच्या लसणाची पेस्ट टाकून परतून घेऊ

स्टेप 5
आता थोडी हळद मीठ टाकून कुस्करलेले वांग्याचे भरीत टाकून मी टाकून मिक्स करून घेऊ

स्टेप 6

वरुन हिरव्या पातेचा कांदा कच्चा टाकून घेऊ भरपूर कोथिंबीर टाकून घेऊ तयार वांग्याचे भरीत

स्टेप 8
वांग्याचे भरीत आणि ज्वारीच्या भाकरी तयार करून घेऊ परफेक्ट असा हा मेनू

हेही वाचा >> खानदेशी स्पेशल झणझणीत काळ मटण सूप; एकदा खाल तर खातच रहाल, नोट करा सोपी रेसिपी

स्टेप 9

छान गरमा-गरमा सर्व्ह करून घ्या..

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Khandeshi vangyache bharit recipe in marathi khandeshi recipe in marathi srk

First published on: 24-11-2023 at 12:45 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×