काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली की नेहमीच पेस्ट्री, चॉकलेट्स, गुलाबजाम असे बाहेरचं पदार्थ खाल्ले जातात. खीर या पदार्थाला पारंपारिकपणे सण आणि विशेष प्रसंगी पसंती दिली जाते. कारण घरी काही बनवायचं म्हटलं की खूपच वेळ जातो. मात्र आज आम्ही आज तुमच्यासाठी झटपट बनणारी खीर रेसिपी घेऊन आलो आहोत. फक्त १ वाटी तांदूळ वापरून तुम्ही रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणासह खाण्यासाठी स्वादीष्ट खीर बनवू शकता. चला तर पाहुयात तुकडा खीर कशी बनवायची.

तुकडा खीर साहित्य –

  • दूध
  • तांदळांची बारीक कणी २ कप
  • ओलं खोबरे किसून १ कप
  • साखर २ कप, तूप २ कप
  • वेलची पूड १ चमचा, सुका मेव्याचे काप २ मोठे चमचे

तुकडा खीर कृती –

प्रथम एक लिटर दूध घ्या. दूध मंद आचेवर उकळायला ठेवा. दूध तव्याच्या तळाला चिकटणार नाही याची काळजी घ्या. दूध वारंवार ढवळत राहा. चार कप पाणी उकळण्यास ठेवा. त्यात ओलं खोबरं टाका. उकळी आल्यावर तूप, तांदळाची कणी टाका. ती शिजल्यानंतर त्यात साखर टाका. तूप सूटेपर्यंत खीर शिजवा. नंतर ताटाला तूप लावून खीर थापा. थंड झाल्यावर त्याचे तुकडे पाडा. त्यानंतर फ्रीजमध्ये थंड करून खाऊ शकता.

हेही वाचा – १ किलो रेशनचा तांदुळ वापरून बनवा २०० खिचे पापड, कढईभर फुलणारा तांदळाचा पापड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही खीर बनवण्यासाठी तुम्हाला जास्तीचा खर्चही करावा लागणार नाही, तसेच झटपट होणारी ही रेसिपी आहे. त्यामुळे आज मंगळवारनिमित्त ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी होते आम्हाला कळवा.