Ratyalyache Pancake Recipe In Marathi: शाळा, कॉलेज असो किंवा अगदी ऑफिस डब्यामध्ये नक्की द्यायचं काय हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. कारण- आपण जे डब्यात देतो, त्याचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे आज आपण मुलांना आवडणाऱ्या पॅनकेकची रेसिपी पाहणार आहोत. पण हा पॅनकेक अगदी हेल्दी आहे. त्यामुळेच आज आपण रताळ्याचा पॅनकेक कसा करायचा ते जाणून घेणार आहोत…

साहित्य

  • 1 मध्यम आकाराचे रताळे
  • 1 गाजर मध्यम आकाराचे
  • 1 कांदा बारीक चिरलेला
  • 2 टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली
  • 1 टेबल स्पून लाल तिखट
  • 1 टीस्पून हळद
  • 1 टीस्पून गरम मसाला
  • 1/2 वाटी तांदळाचे पीठ
  • 2 ते तीन टेबलस्पून बेसन पीठ
  • मीठ चवीनुसार
  • 1 टीस्पून ओवा
  • तेल
  • 2 अंडी आवश्यकतेनुसार

कृती

सर्वप्रथम रताळे साल काढून किसून घ्यावे आणि पाण्यामध्ये ठेवावेत जेणेकरून ते काळे पडणार नाही त्यानंतर गाजर किसून घ्यावे कांदा बारीक चिरून घ्यावा कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.

एका पसरट भांड्यामध्ये हे सर्व एकत्र करून घ्यावे आणि त्यात लाल तिखट हळद मीठ गरम मसाला ओवा घालून घ्यावे आता त्यात तांदळाचे पीठ आणि बेसन पीठ घालून घ्यावे तांदळाचे पीठ नसल्यास तुम्ही गव्हाचे पीठही वापरू शकता तसेच यामध्ये अंडी घालू घ्यावीत जर तुम्हाला अंडे खायचे नसल्यास तुम्ही ते स्किप करू शकता आता सुरुवातीला कोरडे एकत्र करून घ्यावे.

अंड्यामुळे एक ओलसरपणा त्याला येतो जर अंडी घालणार नसाल तर थोडासा पाण्याचा हपका द्यावा आणि हाताने त्याचा छोटा गोळा घेऊन त्यामध्ये गरम पॅनमध्ये पॅन केक थापून घ्यावेत किंवा चमच्याने स्प्रेड करावेत हे पॅनकेक दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यावेत.

पुदिना चटणी गार्लिक डीपी किंवा सॉस सोबत हे पॅन केक खायला मजा येते किंवा हे बँकेत गरमागरम बटर सोबत तसेच आहे खाऊ शकता.

(नोट- ही रेसिपी कुकपॅडवरून घेण्यात आलेली आहे.)