scorecardresearch

चवीला भारी आणि जेवणात रंगत आणणाऱ्या चटकदार आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी जाणून घ्या

आवळ्याचा आरोग्यासाठी पुरेपूर उपयोग करून घ्यायचा असेल तर त्यापासून बनवलेले पदार्थ खायला हवेत

Amla pickle recipes
हिवाळ्यात सहज उपलब्ध होणाऱ्या फळांमध्ये आवळ्याचा प्रामुख्याने समावेश असतो. (Photo : Instagram)

हिवाळा हा ऋतू आरोग्यासाठी अत्यंत्य महत्त्वाचा मानला जातो. हिवाळ्यात अनेक प्रकारची फळं सहज उपलब्ध होतात. हिवाळ्यात सहज उपलब्ध होणाऱ्या फळांमध्ये आवळ्याचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल, आकारानं लहान असलेला आवळा हा अनेक गुणधर्म युक्त असा आहे. तो चवीला तुरट आंबट असला तरी त्याचे शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळेच आवळ्याला बहुगुणी असंही म्हटलं जातं अगदी पित्तापासून ते हाडांच्या मजबुतीसाठी तो फायदेशीर आहे.

सध्या बाजारात आवळे खूप जास्त प्रमाणात आले आहेत. त्या बहुगुणी आवळ्याचा आरोग्यासाठी पुरेपूर उपयोग करून घ्यायचा असेल तर आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ खायला हवेत. जे आपलं आरोग्यही उत्तम ठेवतील आणि जेवणात चव देखील आणतील. आज आम्ही तुम्हाला अशीच एक आवळ्याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर जेवणात रंगत आणणाऱ्या चटकदार आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते पाहूया. आवळ्याचं लोणचं बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे –

हेही वाचा- दही मिरचीने जेवणामध्ये आणा तिखट झटका; पाहा अस्सल विदर्भीय रेसिपी

साहित्य –

  • एक किलो आवळे
  • मीठ एक कप
  • लोणच मसाला दीड पाकीट
  • तेल दोन कप
  • मोहरी दोन चमचे, मोहरीची डाळ अर्धी वाटी

कृती –

हेही वाचा- आता नाश्त्याला बनवा ओटस् मूग डोसा, चवीसोबत मिळवा पुर्ण पोषण; जाणून घ्या रेसिपी

आवळे वाफवून घ्या. थोडे गार झाल्यावर ते तेलामध्ये हलका रंग बदलेपर्यंत ते तळून घ्या. थोडे गार झाले की फोडी करून बिया वेगळ्या करा. आवळे एका भांड्यात काढून घ्या. गरम तेल- एक ते दीड मोठी पळी आवळ्यांवर घालून घ्या. आवळ्याच्या फोडींवर तयार लोणचं मसाला- एक पाकीट घाला. मीठ घालून मिश्रण करा. तेल कडकडीत तापवून त्यात मोहरी घाला. गॅस बंद करून तेल गार होऊ द्या. थोडं गार झाल्यावर त्यात मोहरीची डाळ घाला. उरलेला मसाला घालून एकजीव करून घ्या. हे मिश्रण आणखी गार झाल्यावर एक एक पळी करत आवळ्याच्या फोडींवर घाला.

उपयोग –

आवळा हा अत्यंत हितकर व पथ्यकर सांगितला आहे. त्यानं सर्वच दोषांचे शमन होतं. तसंच शरीरात चांगले धातू निर्माण करण्याचंही काम तो करतो. लोणचं हे चव आणण्यासाठी, तसंच भूक वाढवायला मदत करतं.

मराठीतील सर्व रेसिपी ( Recipes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 19:30 IST