उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लहान मुलांना दिवसभर चवदार, चविष्ट आणि विशेषत: काहीतरी थंडगार खाण्याची इच्छा असते. मात्र बाहेर मिळणारे थंड पदार्थ खाणे अनेकदा लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते. अशावेळी तुम्ही घरच्या घरी गोड मलाईदार कुल्फी बनवून खाऊ शकता. यासाठी स्वादिष्ट पिस्ता कुल्फी घरच्या घरी कशी बनवायची जाणून घ्या…

उन्हाळ्यात घरच्या- घरी बनवा कुल्फी

उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला कुल्फी बनवायची असेल तर तुमच्यासाठी पिस्ता कुल्फी एक सोपी रेसिपी आहे. तुम्ही घरबसल्या दुकानात मिळणाऱ्या कुल्फीचा आनंद घेऊ शकता. विदेशी आईस्क्रीमचा हा देसी वर्जन लहानांपासून मोठ्यांनाही आवडेल. दुपारीच्या कडक उन्हात थंड कूल कूल वाटण्यासाठी तुम्ही कुल्फीची सिक्रेट रेसिपी ट्राय करु शकता.

१) ही रेसिपी जवळपास ५ लोक खाऊ शकतात या हिशोबाने त्याचे साहित्य सांगत आहोत.

२) कुल्फी तयार करण्यासाठी एकूण १ तास १० मिनिटे लागतील.

कुल्फी बनवण्याचे साहित्य

१) १ लिटर फुल क्रीम दूध
२) अर्ध्या कप साखर
३) १ छोटा चमचा केशर
४) ४-५ वेलची
५) १०-१५ चिरलेले आणि उकडलेले बदाम
६) २ चमचे चिरलेला पिस्ता
६) कुल्फीचा साचा

कुल्फी बनवण्याची कृती

१) सर्व प्रथम एका खोल पातेल्यात दूध मध्यम आचेवर उकळवा. लक्षात ठेवा की, दुधाचे दही होऊ द्यायचे नाही, त्यामुळे दूध सतत ढवळत राहावे लागेल.

२) तुम्हाला दूध अर्धे होईपर्यंत उकळावे लागेल, कुल्फी बनवण्याइतपत दूध घट्ट होण्यासाठी सुमारे ३० ते ४० मिनिटे लागतील असा अंदाज आहे.

३) दूध नीट उकळल्यावर त्याचा रंग थोडा बदलेल आणि भांड्यात बुडबुडेही दिसू लागतील.

४) आता दुधात साखर आणि केशर घालून साधारण २ मिनिटे चांगले उकळा.

५) आता दुधात हिरवी वेलची टाका आणि गॅस बंद करा.

६) कुल्फीला सजवण्यासाठी आणि चवीसाठी बदाम किंवा काजू घालायचे असतील तर तेही घाला.

७) दूध नीट मिक्स करून थंड झाल्यावर साच्यात टाका. मोल्ड सेट करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवा, फ्रीजरचे तापमान जास्त नसावे.थोड्या वेळाने फ्रीजर उघडा आणि कुल्फी गोठली आहे की नाही हे पाहण्यासाठी कुल्फीमध्ये चाकू घालून पाहा.

८) कुल्फी सेट झाल्यावर, पिस्ता किंवा तुमच्या आवडीच्या ड्रायफ्रुट्सने सजवून सर्व्ह करा.

ही आकर्षक पिस्ता कुल्फी तुम्ही उन्हाळ्यात मुलांना सर्व्ह करू शकता, पिस्ता व्यतिरिक्त, तुम्ही चॉकलेट, स्ट्रॉबेरी, केशर, अननस इत्यादीसह तुमची आवडती कुल्फी बनवू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता.