केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. केळी नैसर्गिक उर्जेचे स्त्रोत म्हणून काम करतात. दुपारच्या वेळी त्यांचे सेवन केल्याने हिवाळ्यात तुमच्या शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते. तरीसुद्धा आपल्यातील बरेच जण केळी खाण्याचा कंटाळा करतात. पण, केळीचे शिकरण, चिप्स, काप सगळेच आवडीने खातात. तर आज आपण थोडा ट्विस्ट देऊन केळीचे मिल्कशेक कसं तयार करायचं हे पाहणार आहोत. जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच हेल्दी ठरेल. चला तर ‘केळीचे मिल्कशेक’ बनवायची रेसिपी पाहू.

साहित्य :

  • केळी – ३
  • दूध – २ कप
  • काजू, बदाम – १० ते १५
  • दोन चमचे साखर
  • एक चमचा वेलची पूड
  • केळी जास्त पिकलेली असतील तर त्यात तुम्ही साखरेएवजी मध शुद्ध घालू शकता.

हेही वाचा…Makhana Ladoo Recipe: १०० ग्रॅम मखान्यापासून बनवा पौष्टिक अन् चवदार लाडू; पाहा सोपी रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृती :

  • सगळ्यात पहिला केळी सोलून घ्या आणि त्याचे बारीक काप करा.
  • त्यानंतर मिक्सरचं भांड घ्या.
  • त्यात केळ्याचे बारीक केलेले तुकडे, दूध, साखर, बदाम, काजू, वेलची पूड घालून मिक्सरमध्ये हे सर्व बारीक करून घ्या.
  • गरजेनुसार किंवा आवडीनुसार तुम्ही त्यात बर्फाचे तुकडे किंवा थंड पाणी सुद्धा घालू शकता.
  • त्यानंतर तयार मिश्रण काचेच्या ग्लासमध्ये ओतून घ्या आणि त्याच्यावर काजू, बदाम यांचे तुकडे घालावेत.
  • तर अशाप्रकारे तुमचे ‘केळीचे मिल्कशेक’ तयार.