सुट्टीच्या दिवशी घरी हमखास नॉन व्हेज बनवण्याचा बेत असतो. त्यातच चिकन हे अनेकांचे आवडते. चिकन टिक्का, चिकन मसाला, बटर चिकन आदी अनेक पदार्थ आपण नेहमी घरी बनवतो आणि खाण्याचा आनंद लुटतो. पण, तुम्ही कधी घरच्या घरी चिकन सूप बनवून पाहिलं आहे का ? नाही, तर आज आपण आळणी पाणी (चिकन सूप ) कसं बनवायचे हे पाहणार आहोत. हे चिकन सूप प्यायला चविष्ट आणि बनवायला सोपे सुद्धा आहे.

साहित्य :

Make Delicious Home Made Bread Poha For Breakfast Or Evening Snacks Note The Yummy Recipe
नाश्त्याला स्पेशल काय करायचं? झटपट होणारा ‘ब्रेड पोहा’ बनवून पाहा; रेसिपी लगेच नोट करा
young Man takes selfie with leopard
Video : “डर के आगे जीत है..” शेतकरी तरुणाने घेतली चक्क चित्ताबरोबर सेल्फी, शेतातील व्हिडीओ होतोय व्हायरल
Try this amazing Spicy and Tasty Chicken Kharda You Will Love Note The Recipe
नॉनव्हेज प्रेमींना नक्की आवडेल झणझणीत पारंपरिक ‘चिकन खर्डा’; लगेच नोट करा रेसिपी…
Parrot riding a bicycle
VIDEO : काय सांगता! पोपट चक्क सायकल चालवतोय; विश्वास बसत नाही, एकदा व्हायरल व्हिडीओ पाहाच
 • चिकन
 • तूप किंवा तेल
 • वेलची
 • दालचिनी
 • लवंग
 • हळद
 • टोमॅटो, खोबरं, कांदा, आलं, लसूण – पेस्ट
 • मीठ

हेही वाचा…संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत, चविष्ट टोमॅटो स्टिक; पाहा सोपी रेसीपी

कृती :

 • बाजारातून तुम्ही चिकन आणा.
 • चिकन धुवून घ्या व शिजवून घ्या.
 • कुकरमध्ये किंवा एका भांड्यात तूप किंवा तेल घालून त्यात कांदा घाला आणि २ मिनिटे परतवून घ्या.
 • नंतर त्यात चिकन, वेलची, दालचिनी, लवंग, मीठ घाला आणि ५ मिनिटे परतून घ्या.
 • नंतर पाणी घाला. दोन ते पाच मिनिटे तसाच ठेवा. (चिकन शिजल्यानंतर बंद करा).
 • चिकन पूर्ण शिजलं की, त्यातून चिकन वेगळं करा. ( किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात चिकन ठेवू सुद्धा शकता) .
 • त्यानंतर मिक्सरमध्ये कांदा, टोमॅटो, खोबर, आलं, लसूण घालून (फक्त एक चमचा ) पेस्ट करून घ्या.
 • ही पेस्ट चिकन काढून घेतलेल्या पाण्यात टाका. त्यानंतर दोन मिनिटे शिजवून घ्या आणि गॅस बंद करा.
 • अशाप्रकारे तुमचे चिकन सूप तयार.