Recipe: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या दिवसात गरमा गरम भजी खायची खूप इच्छा होते. पण, या दिवसात बऱ्याचदा सर्दी, खोकलादेखील झालेला असतो. अशावेळी तुम्ही ओव्याच्या पानांची पौष्टिक भजी नक्कीच ट्राय करू शकता. आयुर्वेदानुसार ओव्याच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. चला तर मग जाणून घेऊया ओव्याच्या पानाच्या पौष्टिक भजीची रेसिपी…
ओव्याच्या पानाची भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१. २ वाटी ओव्याची पाने
२. २ वाटी बेसन पीठ
३. ४ चमचे तांदळाचे पीठ
४. ३ चमचे लाल तिखट
५. मीठ चवीनुसार
६. १ चमचा धणे पावडर
७. १ चमचा जिरे पावडर
८. चिमूटभर सोडा
९. तेल आवश्यकतेनुसार
ओव्याच्या पानाची भजी बनवण्याची कृती:
हेही वाचा: संडे स्पेशल नाश्त्यासाठी ‘पोह्याचे टेस्टी नगेट्स’; पटकन लिहून घ्या साहित्य अन् कृती
१. सर्वप्रथम ओव्याची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्या.
२. त्यानंतर त्यात बेसनाचे पीठ, तांदळाचे पीठ, मीठ, तिखट, धणे, जिरे पावडर एकत्र करून घ्या.
३. दुसरीकडे कढईत तेल ओतून गरम करून घ्या.
४. आता ओव्याचे एक एक पान या सगळ्या मिश्रणात बुडवा.
५. यानंतर गरम तेलात ओव्याची पाने घाला आणि तळून घ्या.
६. तयार गरमा गरम पौष्टिक ओव्याच्या भजीचा चहासोबत आस्वाद घ्या.