Ragi Biscuits Recipe: मुलांना विविध बिस्किट्स खायला खूप आवडतात. पण बाजारात मिळणाऱ्या बऱ्याच बिस्किटांमध्ये मैद्याचा वापर केला जातो. मैद्याचे पदार्थ सतत खाणं आरोग्यासाठी योग्य मानले जात नाही त्यामुळे आज आम्ही तुम्हला नाचणीचे बिस्किट कसे करायचे हे सांगणार आहोत. नाचणीत कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्ये असतात. शिवाय यामुळे अशक्तपणादेखील दूर होण्यास मदत होते. शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यासदेखील नाचणीचे पदार्थ खाणं फायदेशीर आहे.

नाचणीचे बिस्किट बनवण्यासाठी साहित्य :

१. ६ वाटी नाचणी पीठ
२. ३ वाटी पिठी साखर
३. ३ वाटी तूप
४. २ छोटे चमचे बेकिंग पावडर
५. दूध आवश्यकतेनुसार
६. मीठ चवीनुसार

नाचणीचे बिस्किट बनवण्याची कृती :

हेही वाचा: संडे स्पेशल ‘चिकन सँडविच’ची टेस्टी रेसिपी; पटकन लिहून घ्या साहित्य अन् कृती

१. सर्वात आधी नाचणीचे पीठ आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावी.

२. त्यानंतर त्यामध्ये तूप टाकून मिश्रण एकजीव करावे.

३. नंतर त्यात पिठी साखर आणि थोडे दूध टाकून घट्ट गोळा बनवून घ्यावा.

४. आता तो गोळा ३० मिनिटांसाठी तसाच झाकून ठेवावा.

५. त्यानंतर तो गोळा जाडसर लाटून लहान वाटीच्या साहय्याने त्याचे बिस्किटाप्रमाणे काप पाडा.

६. आता त्याला ओव्हनमध्ये १८० डि.सें. वर २० मिनिटे बेक करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७. तयार नाचणीचे पौष्टिक बिस्किट मुलांना खायला द्या.