scorecardresearch

Premium

Recipe : ‘या’ कंदमुळापासून बनवा आंबट गोड लोणचं; रेसिपी काय आहे पाहा….

हिवाळ्यात मिळणाऱ्या सलगम/शलगम या कंदमुळाचा वापर करून घरी आंबट गोड चवीचे लोणचे बनवता येते. या लोणच्याची रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे, पाहा.

Shalgam, Gobi and Gajar pickle
शलगम, गाजर आणि फुलकोबी वापरुन बनवा आंबट गोड चवीचे लोणचे. [photo credit – Freepik]

लिंबू, कैरी किंवा वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून आपल्या घरात सतत कोणती तरी लोणची बनवली जातात किंवा आणली जातात. उन्हाळ्यात कैरीचे लोणचे हे हमखास बनवले जाते. कारण या काळात, म्हणजे उन्हाळ्यात चांगल्या कैऱ्या, आंबे येत असतात. त्याचप्रमाणे हिवाळ्यातदेखील अनेक प्रकारच्या भाज्या येत असून, त्यांचीदेखील अतिशय सुंदर चवीची लोणची घालता येतात. त्यापैकीच शलगम किंवा सलगम नावाचे एक कंद आहे, ज्याचा वापर करून लोणची बनवली जातात.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून @natashaagandhi या हँडलरने त्यांच्या घरी पन्नास वर्षांपासून बनवल्या जाणाऱ्या शलगम, गाजर आणि फुलकोबीच्या [फ्लॉवर] लोणच्याच्या रेसिपीचा रील व्हिडीओ शेअर केला आहे; तर याची रेसिपी काय आहे ते पाहू.

how to make sabudana papad at home recipe
Recipe : वर्षभर टिकणारे साबुदाणा पापड कसे बनवावे? पापडाचे वाळवण कसे घालावे? पाहा हे प्रमाण
murmura bhaji recipe murmura pakora recipe how to make kurmure bhaji recipe in marathi bhaji kashi banvaychi
कुरमुऱ्यापासून बनवा खमंग, कुरकुरीत भजी; चव एवढी भन्नाट की कधी विसरणार नाहीत, नोट करा रेसिपी
Homemade Tomato Honey Curd Lemon Skin Glow Facemask
चेहऱ्यावर एक डाग राहणार नाही; टोमॅटोचा वापर करून मिळवा सुंदर त्वचा, जाणून घ्या ४ घरगुती फेस पॅक
How to make Sago potato Batata snacks Sabudana potato Chakali Recipe Video Viral
उन्हाळी वाळवणाची तयारी करताय? घरच्या घरी बनवा कुरकुरीत साबुदाणा बटाटा चकली

गाजर, फुलकोबी आणि शलगम लोणच्याची रेसिपी

साहित्य

  • गाजर
  • फुलकोबी
  • शलगम
  • मीठ
  • मोहरी
  • आले
  • मोहरीचे तेल
  • गूळ
  • लाल तिखट

हेही वाचा : तळलेले पदार्थ मऊ पडत आहेत? पाहा, या पाच सोप्या हॅक्स करतील तुमची मदत

कृती

सर्वप्रथम गाजर, फुलकोबी आणि शलगम या सर्व भाज्यांना छोटे छोटे चौकोनी कापून घ्यावे.
गॅसवर एका पातेल्यात पाणी घालून त्यामध्ये थोडे मीठ टाकून सर्व भाज्यांना त्या पाण्यात काही मिनिटांसाठी उकळून घ्यावे.
आता एका खलबत्यामध्ये, मोहरी कुटून घेऊन त्याची बारीक पावडर करावी.
गॅसवर एका पातेल्यात मोहरीचे तेल घालून घेऊन त्यामध्ये आल्याचे बारीक उभे चिरलेले तुकडे आणि गूळ घालून, गूळ विरघळेपर्यंत परतून घ्या.
आता या परतलेल्या पदार्थांमध्ये सर्व भाज्या, कुटलेली मोहरी, मीठ आणि तिखट घालून सर्व पदार्थ पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यावे.
तयार आहे तुमचे, गाजर, फुलकोबी आणि शलगमचे लोणचे.

आता हे लोणचं काचेच्या हवाबंद बरणीमध्ये घट्ट बंद करून ठेवून, अधूनमधून बरणीतील लोणचे वरखाली करत राहा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Make sweet savory carrot cauliflower shalgam roots pickle at home note down the recipe dha

First published on: 26-11-2023 at 18:22 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×