Mango Jam at home: आंब्याच्या सीझनमध्ये आंब्यापासून अनेक विविध रेसिपी गृहिणी ट्राय करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आंब्याचा जाम कसा बनवायचा हे सांगणार आहोत. सहसा लहानमुलांना जाम खायला खूप आवडतो. पण बाजारातील जाम सतत खाणं आरोग्यासाठी योग्य नाही. त्यामुळे हा जाम जर तुम्ही घरीच बनवला तर? मग तो मुलंही आवडीने खातील आणि यामुळे त्यांचे आरोग्यही उत्तम राहिल. चला तर मग जाणून घेऊयात आंब्याच्या जामची रेसिपी…

साहित्य:

१. ४ चमचे तूप
२. अडीच किलो साखर
३. अडीच किलो आंबे (बारीक किसलेले)
४. ३-४ चमचे वेलची पूड
५. केशर

कृती :

हेही वाचा: आम्रखंड, आमरस तेच तेच खाऊन कंटाळलात? मग बनवा आंब्याची नवीकोरी सोपी रेसिपी

१. सर्वात आधी आंबे स्वच्छ धुवून, पुसून नंतर ते सोलून घ्यावे.

२. त्यानंतर ते नीट किसून घ्यावे.

३. आता एका मोठ्या पातेल्यात ३-४ चमचे तूप गरम करावे.

४. तूप गरम झाल्यावर त्यात किसलेला आंबा परतून घ्यावा.

५. आंबा व्यवस्थित परतल्यावर तो हलका सोनेरी रंगाचा झाल्यावर त्यात साखर घालावी.

हेही वाचा: उरलेल्या ब्रेडचं करायचं काय? मग ट्राय करा ‘हा’ पदार्थ; झटपट होणारी रेसिपी लगेच नोट करा

६. साखर विरघळल्यानंतर काही वेळाने त्यात वेलची पूड आणि केशरही घालावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७. ३-४ मिनिटांनी गॅस बंद करुन गार झाल्यावर तयार जाम तुम्ही काचेच्या भरणीत स्टोर करुन ठेवू शकता.