हवेमध्ये जरा गारवा वाढला की, अगदी सहजपणे आपल्या मनामध्ये काहीतरी गरम खाण्याची इच्छा निर्माण होते. पण, कॉफी म्हणा किंवा चहा म्हणा एवढ्यावर आपलं मन काही भरत नाही. त्यासोबत जर नुकतेच तळून काढलेले गरम बटाटेवडे, भजी आणि सोबत कोथिंबीर-पुदिन्याची मस्त हिरवी चटणी असेल तर अहाहा… नुसता विचार केला तरीही आपल्या तोंडाला पाणी सुटतं नाही का? पण या सगळ्या विचारांपाठोपाठ तेलकट पदार्थ खाल्ल्यानं आपण अनावश्यक कॅलरीज खाणार आहोत याबद्दलदेखील एक अपराधी भावना मनात डोकावते.

परंतु, जास्त घाबरू नका. कारण- प्रत्येक प्रश्नावर जसं उत्तर असतं, तसा या समस्येवरदेखील उपाय आहे. सध्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने या भजी, वडे, पॅटिस किंवा इतर तळणीचे पदार्थ बिनातेलाचे बनवता येऊ शकतात हे बऱ्याच रेसिपीजवरून आपल्या लक्षात येऊ लागले असेल. तेव्हा आता आपण येथे समजून घेऊ की, असे पदार्थ कढईभर तेलात सोडण्याऐवजी ते बेक केले जातात किंवा ‘एअर फ्राय’ करून खाल्ले जाऊ शकतात. या तळणीच्या पदार्थांना थोडे आरोग्यदायी बनवायचे असेल, तर त्यासाठी तुम्ही पालेभाज्यांचाही वापर करू शकता.

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Which of the raw and pasteurized milk is beneficial
कच्चे व पाश्चराइज्ड यापैकी कोणते दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
What is the Leidenfrost effect
Leidenfrost Effect : जेवण बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरताय? मग नक्की जाणून घ्या ‘या’ हॅकबद्दल
Aloo Bhujia Recipe
आलू भुजिया बनवण्याची सोपी रेसिपी नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती
Make delicious kheer
दिवाळीतील मिठाई कधी संपणार, असा प्रश्न पडलाय? मग झटपट बनवा मिठाईची स्वादिष्ट खीर
Stop Reheating Your Tea! Expert Shares 3 Ways It Could Be Harming Your Health
चहाप्रेमींनो, थंड चहा पुन्हा गरम करून पिता? मग आताच थांबा, अन्यथा होतील ‘हे’ गंभीर परिणाम

आता थंडीच्या दिवसांत तुम्हाला काही चटपटीत आणि तळणीचे पदार्थ खावेसे वाटले, तर त्यासाठी पुढील पर्यायी रेसिपींचा वापर करून पाहा. बेक आणि एअर फ्राय केलेल्या या पदार्थांमध्ये पारंपरिक तळलेल्या पदार्थांपेक्षा कमी कॅलरीज असतात. त्यामुळे असे पदार्थ तुम्ही कोणत्याही प्रकारची अपराधीपणाची भावना मनात न आणता बिनधास्त खाऊ शकता.

हेही वाचा : Kitchen Tips : यापुढे डोसे, घावण तव्याला अजिबात चिकटणार नाही; ‘हा’ पदार्थ घेईल त्याची काळजी, पाहा ही सोपी ट्रिक

हिंदुस्थान टाइम्स डिजिटलसोबतच्या एका मुलाखतीमध्ये, बेंगळुरू येथील ‘क्लाउड नाईन’मधील मुख्य क्लिनिक आहारतज्ज्ञ अभिलाषा व्ही. यांनी, या तेलाचा वापर न करता बनवता येऊ शकणाऱ्या चार पदार्थांच्या रेसिपीज सांगितल्या आहेत. या रेसिपीजचा उपयोग करून तुम्ही आरोग्याची काळजी घेत, हे पदार्थ खाऊ शकता. मग काय आहेत या रेसिपी ते पाहू.

बिनातेलातील भजी आणि वडे रेसिपी

१. फुलकोबी [फ्लॉवर] भजी

साहित्य

१ कप फुलकोबीचे तुकडे
१ कप बेसन/ चण्याच्या डाळीचे पीठ
हळद
तिखट
मीठ
पाणी

कृती

एका बाऊलमध्ये बेसन, हळद, तिखट, मीठ एकत्र करून, त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालत भजीसाठी योग्य असे मिश्रण बनवावे.
त्यामध्ये फुलकोबीचे तुकडे व्यवस्थित घोळवून एका बेकिंग शीटवर ठेवा.
२० ते २५ मिनिटांसाठी २०० अंश डिग्रीवर ही भाजी बेक करून हिरव्या चटणीसोबत खावी.

२. रताळे आणि पालकाची भजी

साहित्य

१ कप किसलेले रताळे
१ कप बारीक चिरलेला पालक
बेसन पीठ
गरम मसाला
मीठ
पाणी

कृती

एका बाउऊलमध्ये रताळे, पालक, बेसन, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घ्यावे.
त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करावे.
एक एक चमचा मिश्रण बेकिंग ट्रेवर घालून घेऊन, १९० अंश डिग्रीवर बेक करून घ्या.
तयार आहे रताळे आणि पालकाची भजी.

हेही वाचा : रस्समने दात आंबले? पाहा, साऊथ इंडियन रस्सम बनवताना या पाच टिप्स ठरतील उपयोगी

३. झुकिनी आणि मक्याची भजी

साहित्य

१ कप किसलेली झुकिनी
१/२ कप मक्याचे दाणे
बेसन पीठ
जिरे पूड
मीठ
पाणी

कृती

किसलेली झुकिनी, मक्याचे दाणे, बेसन, जिरे पूड, मीठ हे सर्व पदार्थ एका बाउलमध्ये घ्यावे.
त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून भजीचे मिश्रण तयार करून घ्या.
हे मिश्रण बेकिंग ट्रेवर घालून १९० अंश डिग्रीवर १५ ते २० मिनिटांसाठी बेक करून घ्या.

४. कांदा आणि पुदिन्याची भजी

साहित्य

१ कप उभा बारीक चिरलेला कांदा
१/२ कप बारीक चिरलेली पुदिन्याची पाने
बेसन पीठ
बडीशेप
मीठ
पाणी

कृती

एका बाऊलमध्ये कांदा, पुदिना, बडीशेप, मीठ हे पदार्थ एकत्र करावे.
त्यामध्ये आवश्यक असेल तसे पाणी घालून भजीसाठी मिश्रण बनवून घ्या.
भज्यांचे तयार मिश्रण १९० अंश डिग्रीवर बेक करून घ्या.
तयार आहेत कांदा व पुदिन्याची बिनातेलाची भजी.

तेव्हा या अतिशय सोप्या आणि उपयुक्त अशा रेसिपीजचा वापर करून तुमची आवडती भजी आणि वडे तेलाचा अजिबात वापर न करता थोड्या वेगळ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून पाहा. त्यामुळे तेलकट खाल्ल्यामुळे होणारा त्रासही होणार नाही.