scorecardresearch

Premium

Methi Pakoda : हिवाळ्यात असे बनवा गरमा गरम कुरकुरीत मेथी पकोडे; रेसिपी लगेच नोट करा

अनेकदा आपण बटाटा भजी किंवा कांदा भजी करुन खातो पण तुम्ही हिवाळ्यात पौष्टिक मेथी पकोडे सुद्धा करू शकता. कुरकुरीत गरमा गरम मेथी पकोड्यांची चव इतकी स्वादिष्ट असते की जिभेवर रेंगाळत असते. हे मेथी पकोडे कसे बनवायचे, जाणून घेऊ या.

Methi Pakoda
हिवाळ्यात असे बनवा गरमा गरम कुरकुरीत मेथी पकोडे (Photo : Instagram/tarladalal)

Methi Pakoda Recipe : हिवाळा म्हणजे थंडीचा ऋतू. या थंडीच्या दिवसांमध्ये गरमा गरम खायची इच्छा होते.अशात अनेकदा आपण बटाटा भजी किंवा कांदा भजी करुन खातो पण तुम्ही हिवाळ्यात पौष्टिक मेथी पकोडे सुद्धा करू शकता. कुरकुरीत गरमा गरम मेथी पकोड्यांची चव इतकी स्वादिष्ट असते की जिभेवर रेंगाळत असते. हे मेथी पकोडे कसे बनवायचे, जाणून घेऊ या.

साहित्य

 • मेथीची पाने
 • चिरलेला कांदा
 • बेसन
 • मिरचे आणि लसणाचा ठेचा
 • ओवा
 • धनेपूड
 • गरम मसाला
 • खाण्याचा सोडा
 • मीठ
 • हळद
 • हिंग
 • लिंबाचा रस
 • कोंथिबिर

हेही वाचा : हिवाळ्यात बनवला जाणारा पौष्टिक तुरीच्या दाण्याचा झुणका! विदर्भ स्पेशल रेसिपी लगेच नोट करा

Benefits Of Eating Ghee With Black Pepper Daily Morning after waking up How much ghee is okay to eat in a day Ayurveda experts Study
तुपात काळ्या मिरीची पावडर मिसळून खाल्ल्याने शरीराला काय फायदे मिळतील? रोज किती व कसे खावे मिश्रण?
Video Lemon Powder Recipe
Video : येत्या उन्हाळ्यात बनवा लिंबू सरबत पावडर; वर्षभर घेऊ शकता आनंद, ही घ्या रेसिपी
udid dal marathi news, udid dal health benefits in marahi, udid dal food marathi
Health Special: थंडीमध्ये उडदाचे पदार्थ का खावेत? आयुर्वेद काय सांगतो?
5 Ways To Detangle Your Hair Without Causing Damage in winter
Hair Care: हिवाळ्यात केसांचा गुंता होतोय, कोंडा होऊन केस राठ होतात? मग या टिप्स तुमच्यासाठीच

कृती

 • मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्या.
 • त्यात कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबिर टाका.
 • धनेपूड, खाण्याचा सोडा, गरम मसाला, ओवा, हळद, मिरचे आणि लसणाचा ठेचा, हिंग आणि चवीनुसार मीठ टाका.
 • त्यावर लिंबाचा रस टाका
 • त्यानंतर प्रमाणानुसार त्यात बेसन टाका आणि चांगले एकत्रित करा.
 • त्यात थोडे पाणी घालून पकोड्यांचे मिश्रण बनवा.
 • गॅसवर तेल गरम करा.
 • गरम तेलातून पकोडे तळून घ्यावे.
 • ही गरमा गरम पकोडे तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Methi pakoda recipe how to make tasty and crispy methi pakoda foods in winter season ndj

First published on: 05-12-2023 at 13:22 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×