Mushroom Butter Masala Recipe: अनेकांच्या घरी मशरूम रोजच्या रोज खाल्लं जात नाही. बटाटा, कडधान्य किंवा पालेभाजी नियमित बनवली जाते. पण नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो. मुलांना नवीन वेगळं काय बनवून द्यायचा हा प्रश्न पडतो. म्हणूनच आज आपण अशी एक रेसिपी पाहणार आहोत जी अगदी झटक्यात होईल आणि ही मशरूमची रेसिपी सगळेच आवडीने खातील. रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला असतोच आणि अनेकदा कोणत्यातरी खास दिवशी काही वेगळं केलं तर पोट आणि मन दोन्ही तृप्त होतं. यानामित्ताने चला तर मग जाणून घेऊ या, मशरूम बटर मसाला रेसिपी.

साहित्य

  • २०० ग्रॅम मशरूम (स्वच्छ धूऊन पुसून घेणे)
  • 1 कांदा उभा चिरलेला
  • 1 टोमॅटो चिरून
  • 10 काजूगर
  • 2 टेबलस्पून बटर
  • 1 टीस्पून जीरे
  • 1 तमालपत्र
  • 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट
  • 1 टेबलस्पून क्रीम
  • 1 टेबलस्पून काश्मिरी लाल तिखट
  • 1 टीस्पून टिस्पून हळद
  • मीठ चवीनुसार
  • 1 टीस्पून काळिमिरी पावडर
  • कोथिंबीर
  • तेल
  • 1 दालचिनीचा तुकडा
  • 1 टीस्पून कसूरी मेथी
  • 1 टीस्पून गरम मसाला

कृती

मशरूम हव्या त्या आकारात कट करून वाटी मधे काढून घ्या.त्यात १/२ टेबलस्पून काश्मिरी लाल तिखट,काळिमिरी पावडर,मीठ एकत्र करून मशरूमला छान मसाला छान कोट करून घ्या.

पॅनमधे थोडं तेल गरम करून त्यात हे मशरूम ५ मि.फ्राय करून घ्या. मशरूमला स्वतः ची अशी काही चव नसते,म्हणून मसाला आतपर्यंत जाऊन चव छान‌ लागावी म्हणून ही प्रोसेस करणे गरजेचे आहे.

पॅनमधे तेल गरम करून जीरे,कांदा, टोमॅटो,काजू छान मऊ शिजेपर्यंत परतून घ्या.थंड झाल्यावर त्याची बारीक पेस्ट तयार करा.

त्याच पॅनमधे बटर गरम करून त्यात तमालपत्र,दालचिनी परतून घ्यावी. नंतर त्यात वाटलेली पेस्ट घालून परतावी. नंतर त्यात लाल तिखट,हळद,मीठ घालून मिक्स करून ग्रेव्ही ५ मि.छान शिजवा

नंतर त्यात फ्राय केलेले मशरूम कसूरी मेथी,गरम मसाला घालून मिक्स करावे. ५ मि.नंतर त्यात क्रिम घालुन मिक्स करावे. १० मि.मंद आचेवर शिजू द्यावे.कोथिंबर घालून सर्व्ह करावे‌. बटर मशरूम मसाला खाण्यासाठी तयार…

(नोट- ही रेसिपी कुकपॅडवरून घेण्यात आलेली आहे.)