विदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, बिनधास्त, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत. विदर्भातले जेवण” म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.’.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. मात्र इथला सुविख्यात असा “सावजी” प्रकार तिखटच असतो हे अगदी खरे. विदर्भ म्हटलं की सावजी हे नाव हमखास येतच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियतच. चला तर मग पाहुयात नागपूर स्पेशल सावजी मसाला घरच्या घरी कसा बनवायचा.. हा मसाला त्या ठिकाणी कोणत्याही तिखट भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. सावजी मसाला हा प्रत्येक पदार्थाची चव वाढवतो. चला तर पाहुयात त्याची सोपी रेसिपी..
नागपुर स्पेशल सावजी मसाला साहित्य
- ३-४ स्टारफुल
- ५० ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा किस
- २ टेबलस्पुन धणे
- १-२ जायपत्री
- १ टेबलस्पुन सफेद तीळ
- ४-५ मोठ्या वेलची
- ३-४ तमालपत्र
- २-३ दालचिनीचे तुकडे
- २ दगडफुल
- १ टेबलस्पुन तांदुळ
- १ टेबलस्पुन डाळ
- १ टीस्पून खसखस
- १ टीस्पून बडिशोप
- १/२ टीस्पून मिरी
- ५-७ लाल सुक्या मिरच्या
- १/२ टीस्पून लवंग
- ८-९ लहान वेलची
नागपुर स्पेशल सावजी मसाला कृती
स्टेप १
सावजी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य काढुन ठेवा
स्टेप २
कढई गरम झाल्यावर त्यात प्रथम खडे मसाल्यातील मोठे मसाले एकत्र भाजुन घ्या व प्लेटमध्ये काढुन ठेवा
स्टेप ३
नंतर कढईत तांदुळ व डाळ भाजुन काढुन ठेवा
स्टेप ४
नंतर अनुक्रमे बडिशोप, तीळ, खसखस, जीरे एकत्र भाजा व काढुन ठेवा त्यातच लालमिरच्या भाजुन काढुन ठेवा नंतर खोबाऱ्याचा किस लालसर भाजुन काढुन ठेवा
स्टेप ५
सर्व भाजलेले साहित्य प्लेटमध्ये काढुन थंड करून घ्या
स्टेप ६
मिक्सर जारमध्ये मोठे खडे मसाले टाकुन फिरवुन घ्या त्याची जाडसर पावडर तयार होईल
स्टेप ७
नंतर त्यातच खोबरे, मिरच्या, बडिशोप धणे, जीरे, तीळ, खसखस सर्व जारमध्ये टाकुन पावडर करून घ्या.
हेही वाचा >> नागपूर सावजी स्पेशल गवार शेंगा भाजी; आजीच्या सोप्या पद्धतीने बनवा झटपट भाजी
स्टेप ८
तयार सावजी मसाला बाऊलमध्ये काढुन ठेवा व वेज नॉनवेज रेसिपी करताना वापरता येईल थंड झाल्यावर काचेच्या स्वच्छ बरणीत भरून ठेवा व भाज्या नॉनव्हेज पदार्थ करताना वापर करा