Palak pohe vade recipe: सकाळी उठल्यानंतर आपल्याला कडकडून भूक लागलेली असते. यातच सकाळी ऑफिसला जाण्याची घाईगडबड तसेच घर आवरणे, सगळ्यांचे टिफिन तयार करणे, अशी धावपळ सुरु असते. यात घरच्या गृहिणीला नाश्ता तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.ऑफिसला जाताना आपल्याकडे इतकी धावपळ असते की, सर्व साग्रसंगीत करायला वेळ नसतो मग अशावेळी कधीतरी केवळ ब्रेड बटर किंवा चहा, कॉफी आणि टोस्ट अशा प्रकारचा नाश्ता करून आपण घराबाहेर पडतो. यासाठीच, सकाळच्या नाश्त्याला झटपट, इन्स्टंट पण तितकेच हेल्दी आणि पौष्टिक पालक पोहे वडे नक्की ट्राय करा. पालक पोहे वडे हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ आहे. हे वडे आरोग्यास पोषक असतात कारण यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून आपण हे वडे बनवू शकतो. पालक पोहे वडे सकाळी नाश्त्यामध्ये बनवू शकतो कारण हा झटपट होणारा पदार्थ आहे व सर्वांना आवडतो सुद्धा आणि लहान मुलं तर हा पदार्थ खूप आवडीने खातात. चला तर मग आपण बघूयात पालक पोहे वडे कसे बनवतात.
पालक पोहे वडे साहित्य
- पालक – २ वाटी
- पोहे – १ वाटी
- साबुदाणा – १/२ वाटी
- हिरवी मिरची – ४
- दही – १ वाटी
- कोथिंबीर – १/२ वाटी
- खाण्याचा सोडा – चिमूटभर
- मीठ – चवीनुसार
पालक पोहे वडे कृती
प्रथम साबुदाणा साधारण ७ ते ८ तास भिजत घालावा.
पोहे १ मिनिट पाण्यात भिजत ठेवावे. नंतर त्यातील पाणी काढून ते १० मिनिटे झाकून ठेवावे.
पालक बारीक चिरून घ्यावा. नंतर भिजलेल्या पोह्यात पालक, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ, खाण्याचा सोडा चिमूटभर, कोथिंबीर टाकावी. सर्व जिन्नस हाताला तेल लावून एकजीव करावे.
भिजलेला साबुदाणा मिश्रणात घालावा व मिश्रण एकजीव करावे.
प्लास्टिक कागदावर वडे थापावे. व गुलाबी होईपर्यंत तळावे.
आता तळलेले वडे प्लेट मध्ये काढून त्यावर दही घालावे. वरून कोथिंबीर टाकून सजावट करावी. आता वडे खाण्यास तयार आहेत.
