तुम्हाला मलईदार आणि मसालेदार ग्रेव्ही आवडते? तर तुम्ही ही सोपी पनीर, आलू कोफ्ता रेसिपी घरी नक्की करून पाहा.विशेष म्हणजे ही खास डिश तयार करण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो. चला तर मग जाणून घेऊयात या खास डिशची रेसिपी.

पनीर, आलू कोफ्ता साहित्य

१ कप पनीर
२ उकळले आळू
चिमूटभर मीठ,
१नमिरची आणि
१ कप बेसन
२ कप तेल
२ सर्व्हिंग स्पून तेल
हिंग,कढीपत्ता,
१ tsp मोहरी,
१ लवंग, एक वेलची, दोन काळी मिरी
१ इचं आले, ६,७ लसूण,
१ कांदा, २ टोमॅटो,
६,७ काजू आणि1 मिरचीची उकडलेली पेस्ट
१/२ tsp हळद
१ tsp धणे पावडर घाला,
२ चमचा मलाई
मिरची पावडर (गरज असल्यास)
मीठ
पनीर मसाला
२ ग्लास पाणी
थोडी कसुरी मेथी घाला
कोथिंबीरच्या पानांनी सजवा

पनीर, आलू कोफ्ता रेसिपी

१. प्रथम पनीर, उकळले आलू आणि कोथिंबीर, चिमूटभर मीठ, एक मिरची आणि बेसन यांचा कोफ्ता बनवा.

२. नंतर दोन कप तेलात गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्या. तर दुसरी कढई गरम करा आणि दोन सर्व्हिंग स्पून तेल घाला आणि त्यात हिंग, कढीपत्ता, मोहरी, एक लवंग, एक वेलची, दोन काळी मिरी घाला.

३. नंतर त्यात आले, लसूण, कांदा, टोमॅटो, काजू आणि मिरचीची उकडलेली पेस्ट घाला आणि तीन मिनिटे शिजवा. नंतर हळद आणि धणे पावडर घाला, पुन्हा मिक्स करा आणि दोन चमचा मलाई घाला.

४. दोन मिनिटांनंतर मिरची पावडर (गरज असल्यास), मीठ आणि पनीर मसाला आणि दोन ग्लास पाणी घाला. पाच मिनिटे शिजवा नंतर थोडी कस्तुरी मेथी घाला आणि आणखी एक उकळी द्या.

हेही वाचा >> Shravan 2024: श्रावणी सोमवारच्या उपवासाला बनवा चविष्ट रताळ्याचे पॅटीस; वाचा सोपी रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. नंतर ही ग्रेव्ही कोफ्त्यावर फिरवून कोथिंबीरच्या पानांनी सजवा आणि गरम भात आणि चपातीसोबत सर्व्ह करा.