Paneer Malai Kofta Recipe: पनीर टिक्का, क्रिस्पी पनीर आणि पनीरच्या अशाच अनेक रेसिपी तुम्ही अनेकदा ट्राय केल्याच असतील. अनेकदा घरीही आपण पनीरच्या अनेक डिशेस बनवतो. लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सगळेच पनीर अगदी आवडीने खातात. पनीरच्या स्टार्टरपासून ते मेन कोर्सपर्यंत आवडीने खाणारे खव्वये अनेक आहेत. पण आपल्याला सगळेच पदार्थ घरी बनवणं जमत नाही. पण आज आपण घरच्या घरी पनीरची सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी जाणून घेणार आहोत. या रेसिपीचं नाव आहे ‘पनीर मलाई कोफ्ता’.

साहित्य

१०० ग्रॅम पनीर

१ उकडलेला टोमॅटो

१ चिरलेली हिरवी मिरची

१ टेबल स्पून मीठ

चिरलेले काजू

कोथिंबीर

खडे मसाले

जीरं

२ चिरलेले कांदे

२ चिरलेले टोमॅटो

हिरवी मिरची

१ टेबल स्पून मीठ

१ टेबल स्पून लाल तिखट

१ टेबल स्पून हळद

१ टेबल स्पून धणे पावडर

कसुरी मेथी

गरम मसाला

हेही वाचा… कोबीची ‘ही’ नवीकोरी रेसिपी लगेच ट्राय करा! नाव ऐकूनच तोंडाला सुटेल पाणी, वाचा साहित्य आणि कृती

कृती

  1. कोफ्ता बनवण्यासाठी १०० ग्रॅम पनीर, १ उकडलेला टोमॅटो, १ चिरलेली हिरवी मिरची, १ टेबल स्पून मीठ, थोडे चिरलेले काजू आणि हिरवी कोथिंबीर घ्या.
  2. हे सगळं मिक्स करून छोटे गोळे तयार करा.
  3. हे गरम तेलात तळा. तुमचा कोफ्ता तयार आहे.
  4. दुसऱ्या कढईत थोडे खडे मसाले, जीरं, २ चिरलेले कांदे, २ चिरलेले टोमॅटो, हिरवी मिरची, १ टेबल स्पून मीठ, १ टेबल स्पून लाल तिखट, १ टेबल स्पून हळद, १ टेबल स्पून धणे पावडर आणि थोडं पाणी घ्या.
  5. १० मिनिटं शिजवा आणि मिक्सरमध्ये लावून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा.
  6. पॅनमध्ये थोडं तेल घ्या आणि पेस्ट घाला.
  7. त्यात क्रीम, कसुरी मेथी आणि गरम मसाला घाला.
  8. तुमची पनीर कोफ्ता करी तयार आहे.
  9. कोफ्ता करीमध्ये घाला.
  10. तुमचा पनीर कोफ्ता तयार आहे. आनंद घ्या.

हेही वाचा… चमचमीत खायचं मन करतंय? मग या सोप्या पद्धतीने बनवा ‘चना चाट’, लिहून घ्या साहित्य आणि कृती

पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.