रविवार म्हणजे नॉन व्हेज असं समीकरण बहुतांश मराठी घरांमध्ये पाहायला मिळते. काहीजणांकडे तर रविवारी ठरवून नॉन व्हेज खाल्ले जाते. रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे घरामध्ये सर्वजण असतात. अशा वेळी आराम करायच्या दिवशी चमचमीत काहीतरी खायला मिळालं तर किती बरं होईल असं प्रत्येकाला वाटत असते. प्रत्येक सन्डेला चिकन,मटण खाऊन कंटाळा येतो, तेव्हा पटकन होणारा पदार्थ करावा असे वाटते,मग हा पदार्थ छान आहे. आज आपण पाहणार आहोत पेशावरी कढई गोश्तची रेसिपी

पेशावरी कढई गोश्त बनवण्यासाठी साहित्य

१ किलो मटण दीड इंचाचे तुकडे

५-६ मध्यम आकाराचे टोमॅटो

५-६ हिरव्या मिरच्या (अर्ध्या कापून)

२ चमचे आले चिरून

२ चमचे लसूण चिरलेला

२ चमचे चिरलेली कोथिंबीर

अर्धा कप तूप

२ चमचे मीठ

पेशावरी कढई गोश्त रेसिपी

१. हे बनवण्यासाठी प्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून क्रिस-क्रॉस पद्धतीने कापून घ्या. आता एक पॅन मोठ्या आचेवर ठेवा आणि त्यात ३-४ कप पाणी गरम करा.

२. पाण्याला उकळी आल्यावर पॅनमध्ये टोमॅटो घालून झाकण ठेवून ३-४ मिनिटे शिजू द्या. आता पॅन गॅसवरून काढा आणि टोमॅटो १०-१५ मिनिटे थंड होऊ द्या.

३. यानंतर टोमॅटो पाण्यातून काढून त्याची साल काढा. आता पॅन मोठ्या आचेवर ठेवा आणि त्यात तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात मटण आणि मीठ घालून ४-५ मिनिटे परतून घ्या.

४. पॅनला घट्ट बसणारे झाकण ठेवा आणि मंद आचेवर २०-२५ मिनिटे शिजवा. मध्ये मध्ये मटण ढवळत राहा. आता सोललेले टोमॅटो, हिरवी मिरची, आले आणि लसूण घालून चांगले मिक्स करा.

हेही वाचा >> उन्हाळ्यात तुम्हाला थंड ठेवेल “मोहब्बत का शरबत” नोट करा रिफ्रेशिंग मराठी रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. त्यानंतर पॅन पुन्हा झाकून ठेवा आणि एक तास किंवा मटण मऊ होईपर्यंत शिजवा.