गणेशोत्सवानंतर पितृपक्षाला सुरवात झाली आहे. या काळात पितरांची पुजा केली जाते, त्यांना नैवद्य दाखवला जातो. पितरांच्या नवैवद्या ताटामध्ये विविध खाद्यपदार्थ असतात ज्यामध्ये भेंडी, गवार, मेथी, कारले, बटाटा, लाल भोपळा यांसारख्या सात्विक भाज्या असतात. तसे अळू वडी, थापीववडी, विविध प्रकारचे भजी, पापड कुरडई, खीर, गोड पुरी, वरण भात, कढी, पोळी अथवा पुरणपोळी, तूप असे विविध पदार्थ बनवले जातात. या विविध पदार्थांपैकी थापीववडी किंवा पातवडी कशी बनवायची ते जाणून घेऊ या..

थापीववडी कृती

कडीपत्ता – १०-१२ पाने
हिरवी मिरची – २-३ मिरच्या
लसूण – दोन लसणाच्या पाकळ्या
आले – एक छोटा तुकडा चिरलेला
ओवा – अर्धा चमचा
धणे – अर्धा चमचा
जिरे – अर्धा चमचा
बेसन पीठ – १ वाटी
पाणी – दीड वाटी
चिरलेली कोथिंबीर – अर्धी वाटी
हळद – चिमुटभर
मीठ – आवश्यकतेनुसार

हेही वाचा –एकदा अख्खा मसूर बिर्याणी खाऊन पाहा, चिकन किंवा मटण बिर्याणी विसरून जाल! झटपट लिहून घ्या सोपी रेसिपी

थापीववडी रेसिपी

१) प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात कडीपत्ता, हिरवी मिरची, लसून, आले, ओवा, धणे, जिरे टाका आणि बारीक पेस्ट करून घ्या.

२) त्यानंतर एका भांड्यात बेसन पीठ घ्या त्यात चिरललेली कोथिंबीर, हळद आणि मीठ टाका आणि सर्व गाठी फोडून मिश्रण एकजीव करून घ्या

३) आता कढई तापवून त्यात तेल टाका आणि मोहरी तडतडली की त्यात जिरे टाकून तयार हिरवी मिरची, लसून, आल पेस्ट टाका.

४) आता त्यात बेसन पीठ टाका आणि एकसारखे पळीने फिरवत राहा जेणेकरून गाठी होणार नाही.

५) मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून एक वाफ द्या.

६) एका ताटील वडीचे पीठ टाका आणि चमच्यानेच सर्वत्र पसवून घ्या. थोडं थंड झाल्यावर हाताचे थापून घ्या

७) आता त्यावर खिसलेले खोबरे, कोथिंबीर आणि तीळ टाकून सजवा.

हेही वाचा –झणझणीत बटाट्याचा ठेचा! एकदा खाऊन तर पाहा, झटपट लिहून घ्या रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुमची थापीववडी म्हणजेच पातवडी तयार आहे.