Breakfast Recipe : दररोज नाश्त्याला काय वेगळं करावं, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. पोहे, उपमा, इडली, डोसा, मेदू वडा खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर सकाळी नाश्त्याला एक हटके रेसिपी बनवू शकता. ही रेसिपी खूप कमी लोकांना माहिती आहे. मेदू वडा आपण नेहमीच खातो पण तुम्ही कधी पोह्यांचे वडे खाल्ले आहे का? हो, पोह्यांचे वडे. पोह्यांपासून बनवता येणारा हा पोहा वडा अगदी १५ मिनिटांमध्ये तयार होतो. नेहमी नेहमी पोहे खाऊन कंटाळला असाल तर पोह्यांपासून तयार होणारा हा आगळा वेगळा पदार्थ नक्की ट्राय करा. चवीला खुसखुशीत वाटणारे पोह्यांचे वडे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवू शकता. हा कुरकुरीत पोहा वडा कसा बनवायचा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर टेन्शन घेऊ नका. ही सोपी रेसिपी लगेच नोट करा.

साहित्य

 • पोहे
 • तांदळाचे पीठ
 • बारीक चिरलेला कांदा
 • ढोबळी मिरची
 • किसलेला गाजर
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • हिरव्या मिरचीचे तुकडे
 • किसलेले आले
 • लाल तिखट
 • धनेपूड
 • हळद
 • चाट मसाला
 • तेल
 • चवीनुसार मीठ

हेही वाचा : Breakfast Recipe : गव्हाच्या पिठापासून बनवा सकाळी झटपट नाश्ता, लगेच ही सोपी रेसिपी नोट करा

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
What happen if color is applied on the uniform of a policeman?
होळीच्या बंदोबस्तावेळी पोलिसांच्या वर्दीला रंग लागला तर काय? आपण पोलिसांना रंग लावू शकतो का? जाणून घ्या

कृती

 • सुरुवातीला तुम्हाला हव्या त्या प्रमाणात पोहे घ्या. या पोह्यामध्ये पाणी घाला. स्वच्छ पाणी घालून हे पोहे दोनदा धुवून घ्या.
 • त्यात पुरेसे पाणी टाका आणि पाच मिनिटे पोहे पाण्यात भिजून ठेवा.
 • त्यानंतर त्यातील पाणी काढून घ्या. हाताने हे पोहे मॅश करा.
 • त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ घाला.
 • बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, किसलेला गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे तुकडे, किसलेले आले टाका.
 • त्यानंतर लाल तिखट, धनेपूड, चवीनुसार मीठ, हळद, चाट मसाला टाकावा आणि हे मिश्रण एकत्र करावे.
 • मेदू वडासारखा याला आकार द्या. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊ शकता.
 • याच पद्धतीने सर्व वडे तयार करा.
 • त्यानंतर गॅसवर कढईत तेल गरम करा.
 • कमी आचेवर हे वडे तळून घ्या.
 • कुरकुरीत वडे तळल्यानंतर तुम्ही हे वडे तुमच्या आवडीच्या चटणीबरोबर खाऊ शकता.
 • सकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.