पापलेट मासा कसा दिसतो, असं माहित नसणारा माणूस सापडणे कठीण आहे. पापलेट मासा सर्वांनाच खायला आवडतो. याला इंडियन बटर फिश देखील म्हणतात. हा मासा खायला चवदार आहे. पापलेटमध्ये अन्न शोषणासाठी असणारे प्रथिनं खूप मोठ्या प्रमाणात आहेत, तसेच मोठ्या प्रमाणात ओमेगा थ्री फॅट्टी अॅसिड देखील यात मिळतं. मात्र, आम्ही तुमच्यासाठी आज पापलेटची खास रेसिपी घेऊन आलो आहोत. आतापर्यंत तुम्ही बिर्यानी, चिकन राइस, मटण राइस खाल्ला असेल, मात्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पापलेट सुका…

पापलेट सुका साहित्य

  • २ मोठे आकाराचे पापलेट
  • २ कांदे बारीक चिरून
  • १ वाटी ओले खोबरे
  • ४ हिरव्या मिरच्या
  • १ इंच आलं बारीक तुकडे करून
  • २ चमचे चिंचेचा कोळ
  • १ चमचा धणे
  • १/२ चमचा हळद
  • १/२ चमचा लाल तिखट
  • १५ त्रिफळ गरम पाण्यात भिजवून
  • कोथंबीर आवडीनुसार
  • मीठ आवश्यकतेनुसार
  • २ पळी खोबरेल तेल

पापलेट सुका कृती

१. सर्वात आधी पापलेट स्वच्छ साफ करून साफ करुन घ्या.पापलेट नीट साफ करून त्याचे आपल्या आवडत्या आकारात पिसेस करून घ्यावेत आणि त्याला मीठ लावून ठेवावे.

२. ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, आलं थोडी कोथिंबीर व चींच याचे जाडसर सुके वाटण करून घ्यावे.

३. कढईत तेल गरम झाल्यावर त्यात दोन उभ्या मिरच्या चिरून व कापलेला बारीक कांदा घालून तांबूस रंगावर परतून घ्यावे. नंतर त्यावर हळद आणि लाल तिखट घालावे नीट मिक्स केल्यावर, कापलेले मीठ लावलेले पापलेटचे तुकडे घालून मिक्स करून एक मिनिट झाकून ठेवावे.

हेही वाचा >> उरलेल्या भाताचा करा सुके बोंबील घालून मऊ मोकळा भात; १ खास युक्ती-आवडीने खातील सगळे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४. नंतर ओल्या खोबऱ्याचे वाटण घालून आवश्यकतेनुसार मीठ घालून नीट ढवळून घ्यावे व सर्वात शेवटी गरम पाण्यात भिजवून ठेवलेली तिरफळं घालून एक मिनिट वाफ काढून घ्यावे. गरमागरम तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करावे.