पुण्याची स्पेशालिटी म्हटली की अनेकांना आठवते ती बाकरवडी, पुणेरी मिसळ. पण त्याही पलीकडे जात पुण्यात केला जाणारा पदार्थ म्हणजे मटार उसळ. आजही थंडीत ओले वाटणे (मटार) बाजारात आल्यावर पुण्यात घरोघरी मटार उसळ केली जाते. गोडसर मटार आणि त्याला लावलेले ओल्या खोबऱ्याचे वाटण म्हणजे पहिल्याच घासाला सुखाचा अनुभव आहे. तेव्हा ही मटार उसळ घरी नक्की करून बघा.

मटार उसळ साहित्य –

मटार – ३ ते ४ वाट्या
खोबरं – अर्धी वाटी
आलं – १ ते २ इंच
लसूण – ७ ते ८ पाकळ्या
मिरच्या – २ ते ३
कांदा – १
काजू – ६ ते ८
पुदिना – १ वाटी
कोथिंबीर – १ वाटी
मीठ – चवीनुसार
साखर – चवीनुसार
धणे- जीरे पावडर – अर्धा चमचा
तेल – २ चमचे
फोडणीचे सामान

मटार उसळ कृती –

मटार सोलून स्वच्छ धुवून घ्यावे. कांदा चिरुन आणि खोबऱ्याचे बारीक काप करुन घ्यावेत.

आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर, पुदीन, खोबरं, काजू, कांदा मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पेस्ट करुन घ्यावी.

कढईत तेल घालून त्यामध्ये मोहरी, जीरं, हिंग, हळद घालून त्यामध्ये ही पेस्ट टाकून चांगली परतून घ्यावी. त्यात मटार घालून अंदाजे पाणी घालावे.

सगळे चांगले एकजीव करुन त्यामध्ये धणे-जीरे पावडर, मीठ आणि साखर घालावी. एक उकळी आली की गॅस बारीक करुन झाकण ठवून चांगले शिजू द्यावे.

हेही वाचा >> पारंपारिक पद्धतीने बनवून पहा गुळाची खीर; हिवाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर अशी पौष्टीक रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काजू, कांदा, खोबरं यामुळे ग्रेव्हीला घट्टपणा येतो आणि पुदीना, कोथिंबीर आणि मिरचीमुळे छान हिरवा रंग येतो.
ही उसळ ब्रेड किंवा पुऱ्या, गरम फुलके, पोळी कशासोबतही अतिशय छान लागते