मेथीच्या गट्ट्याची भाजी ही एक अस्सल राजस्थानी डिश आहे जिने खूप कमी काळात आपल्या स्वादिष्टपणामुळे देशभरात लोकप्रियता मिळविली आहे. ही गट्टयाची टेस्टी भाजी तयार करण्यासाठी आपण एकतर गट्टे तळून किंवा उकडवून ही पाककृती बनवू शकता. आपण या भाजीचा साइड डिश म्हणून चपाती, पुरी, नान, कुलचा आणि भातासोबत देखील आस्वाद घेऊ शकतो. मग वाट कसली बघताय? चला तर जाणून घ्या या स्वादिष्ट डिशची साधीसोपी रेसिपी!

साहित्य:

  • दोन कप बेसन
  • एक चमचा जिरं
  • दोन चमचे लाल तिखट
  • एक चमचा हळद
  • एक चमचा आमचुर पावडर
  • चवीनुसार मीठ
  • गरम मसाला
  • शेंगदाण्याचे तेल
    आवश्यकतेनुसार पाणी

कृती:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात दोन कप बेसन पीठ, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि तेल घ्यावे.
  • नंतर या सर्व साहित्यात थोडसं पाणी मिसळून त्याचे छोटे छोटे गट्टे (गोळे) तयार करावे.
  • हे तयार बेसणाचे गट्टे 10 मिनिटे गरम पाण्यात उकळून घ्यावे.
  • नंतर मग जिरे, मीठ, हळद व लाल तिखट पावडर ही सर्व साहित्य एकत्र चांगल मिक्स करावे.
  • आता एक वेगळी कढई घेऊन त्यामध्ये जिरे, मीठ, हळद आणि लाल तिखट पावडर गरम मसाला घालून मिक्स करावी.
  • हा मसाला चांगला कलसला की मग त्यात उकडलेले किंवा तळलेले बेसणाचे गट्टे सोडून द्यावे आणि त्याला दहा मिनिटे चांगली उकळी येऊ द्यावी .

हेही वाचा >> श्रावण स्पेशल: या सोमवारी ट्राय करा ‘उपवसाचे खुसखुशीत थालीपीठ’ करायला सोपे खायला चविष्ट…पाहा रेसिपी

  • चवदार भाजी होण्यासाठी त्यात आमचुर पावडर घालावी आणि 10 ते 20 मिनिटे मिश्रण तसंच राहु द्यावे अशा पद्धतीने आपली चमचमीत गट्ट्याची भाजी तयार झाली आहे.आपण ही गट्टयाची भाजी पोळी, पुरी, नान, कुलचा आणि भातासोबत देखील खाऊ शकतो.