रोज रोज त्याच त्याच भाज्या बनवून कंटाळा आला की जेवणाला काय वेगळं बनवानं सुचत नाही. तेच तेच खाऊन घरातील मंडळींनाही कंटाळा आलेला असतो. काय भाजी बनवावी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर तुम्ही झटपट रसीली आलू गोभीची भाजी बनवू शकता. चपाती किवा मऊ तांदळाच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी ही भाजी उत्तम पर्याय आहे.
रसीली आलू गोभी साहित्य
- १ लहान फुलकोबी
- ३ बटाटे
- १ चमचा मोहरीचे तेल
- हिंग,
- १ /२ tsp मोहरी,
- १/२ tsp जिरे
- थोडी कढीपत्ता
- १ टीस्पून आले,
- १ tsp लसूण पेस्ट घाला
- १ छोटा चिरलेला कांदा
- १/२ tsp हळद
- १ tsp धणेपूड घाला
- २ चिरलेला टोमॅटो
- १ ग्लास पाणी
रसीली आलू गोभी कृती
सर्वप्रथम एक लहान कोबी आणि तीन बटाटे चिरून घ्या आणि पाच मिनिटे उकळवा. नंतर कुकर गरम करून त्यात एक चमचा मोहरीचे तेल घालून त्यात हिंग, मोहरी, जिरे आणि थोडी कढीपत्ता घाला.
दोन मिनिटांनंतर एक टीस्पून आले, लसूण पेस्ट घाला आणि एक छोटा चिरलेला कांदा घाला आणि हलवा. नंतर हळद आणि धणेपूड घालाय
एक मिनिटानंतर चिरलेला टोमॅटो घाला आणि पुन्हा मिक्स करा. नंतर बटाटे आणि फ्लॉवर घाला, सर्वकाही चांगले मिसळा नंतर मीठ घाला.
नंतर त्यात एक ग्लास पाणी आणि एक चमचा किचन किंग गरम मसाला घालून कुकरचे झाकण लावा आणि मध्यम आचेवर एकच शिट्टी द्या . नंतर गॅस बंद करा.
पाच मिनिटांनी झाकण उघडा. भाजीला कोथिंबीर चिरून सजवा आणि पराठे आणि कोशिंबिरीसोबत सर्व्ह करा.