Fansachi bhaji recipe in Marathi: आजच्या लेखात आपण फणसाची मसाल्याची भाजी कशी तयार करायची याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत. मसाला फणसाची भाजी बनवणे खूप सोपे आहे. फक्त शाकाहारी लोकच नाही तर नॉनव्हेज खाणाऱ्यांनीही ही भाजी जरूर खावून पहावी, कारण मसाला फणसाची चव नॉनव्हेजपेक्षा कमी नसते. शिवाय, फणसातही अनेक पोषक तत्व असतात. तुम्ही पोळी, भाकरी आणि भातासोबत सर्व्ह करू शकता. तुम्ही घरी कोरडे मसाले बारीक करून त्याची चव वाढवू शकता.

साहित्य:

  • फणस
  • टोमॅटो
  • कांदा
  • आले लसूण पेस्ट
  • सुकी लाल मिरची
  • लाल मिरची पावडर
  • हळद
  • धने पावडर
  • गरम मसाला
  • जिरे
  • तेल
  • मीठ

कृती:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • सर्वप्रथम फणसाचे छोटे छोटे तुकडे करावे. हे करताना हाताला मोहरीचे तेल लावावे यामुळे फणस हातात चिकटत नाही.
  • नंतर लोखंडी कढईत तेल टाकावे. त्यात जिरे, कोरडी लाल मिरची टाकावी. आता त्यात बारीक चिरलेला कांदा,आले-लसूण पेस्ट घालावी.नंतर त्यात वाफवलेले फणस टाकावे.
  • त्यात धनेपूड, गरम मसाला, हळद, मीठ, तिखट टाकावे. आणि हे मिश्रण चांगले मिक्स करावे. आता त्यात किसलेले टोमॅटो टाकावा. या सर्व गोष्टी नीट फ्राय करून घ्यावे.

हेही वाचा >> तिखट जिलेबी! एकदा खाल तर गोड जिलेबी विसरुन जाल…ही घ्या सोपी रेसिपी

  • मसाला शिजल्या नंतर त्यात थोडे पाणी घालून भाजी शिजवून घ्यावी. फणस मऊ झाल्यावर गॅस बंद करा. आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी तुमची फणसाची भाजी तयार आहे. तुम्ही ही पोळी, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता.