कोल्हापूर म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर दोनच गोष्टी उभ्या राहतात. एक कोल्हापुरी चपला आणि दुसरी म्हणजे कोल्हापुरी रस्सा. कोल्हापूरचा झणझणीत, लाल भडक तांबडा रस्सा; त्याबरोबर दिसायला व चवीला तितकाच सौम्य असणारा पांढरा रस्सा, चिकन, आणि लुसलुशीत भाकरीचे जेवण म्हणजे सुख. पण तुम्हाला पांढऱ्या रश्श्याचा आणि इतिहासाचा खूप जवळचा संबंध आहे, हे माहित आहे का? पांढरा रस्सा नेमका कुणी आणि कधी तयार केला ते पाहण्यासाठी रेसिपीच्या शेवटी दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा.

तर, कोल्हापूरचा प्रसिद्ध तांबडा रस्सा कसा करायचा हे अनेकांना माहित आहे. मात्र आज आपण कोल्हापूरचा सौम्य चवीचा, पांढरा रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून @me_haay_foodie नावाच्या अकाउंटने शेअर केली आहे. पांढरा रस्सा तयार करण्याची कृती पाहा आणि बनवून बघा.

हेही वाचा : Recipe : पौष्टिक खा तंदुरुस्त राहा; ‘मखाणा रायते’ बनवण्याची सोपी रेसिपी पाहा….

कोल्हापुरी पांढरा रस्सा रेसिपी :

साहित्य

तेल
चिकन
काजू
भाजलेली खसखस
लसुण
आले
हिरवी मिरची
तमालपत्र
लाल मिरची
मोठी वेलची
मिरे
लवंग
वेलची
चक्रीफुल
नारळाचे दूध

हेही वाचा : Kitchen tips : स्वयंपाक घरातील मच्छीचा वास कसा घालवावा? पाहा या ४ सोप्या टिप्स

कृती

  • सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून एका बाऊलमध्ये घ्यावे.
  • आता चिकनला थोडेसे मीठ लावून घ्या.
  • गॅसवर एक पातेले ठेऊन त्यामध्ये थोडेसे तेल घालून घ्यावे.
  • तेल तापल्यानंतर त्यामध्ये मीठ लावलेले चिकन घालून काही मिनिटे शिजवून घ्या.
  • चिकन शिजल्यानंतर त्यामध्ये दोन भांडी पाणी घालून चिकन ढवळून घ्यावे.
  • आता एका मिक्सरच्या भांड्यात १० -१२ भिजवलेले काजू, आले, ८-१०लसूण पाकळ्या, २ मिरच्या, १ लहान चमचा भाजलेली खसखस घालून सर्व पदार्थांची मस्त पेस्ट करून घ्या.
  • एक पातेलं गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालून घ्या.
  • तेल तापल्यानंतर त्यामध्ये तमालपत्र, वेलची, लाल मिरच्या, मिरी, लवंग, चक्रीफूल असे खडे मसाले घालून घ्या.
  • आता यामध्ये तयार केलेले काजूचे पांढरे वाटण घालून छान परतून घ्या.
  • वाटण शिजल्यानंतर आणि तेल सोडू लागल्यावर, पातेल्यामध्ये चिकन आळणी [चिकन शिजवताना उकळून घेतलेले पाणी] घालून घ्यावी.
  • सर्व पदार्थ छान ढवळून घ्या. आता हळूहळू रस्सा घट्टसर होऊ लागेल.
  • यामध्ये चवीनुसार मीठ घालून, वरून १ कप नारळाचे दूध घालून घ्या.
  • मंद आचेवर सर्व पदार्थ छान शिजू द्यावे. मात्र रश्याला सतत ढवळत राहा.
  • रश्याला एक उकळी आल्यानंतर पातेल्याखालील गॅस बंद करावा.
  • तयार आहे आपला कोल्हापुरी पांढरा रस्सा.

हेही वाचा : आमटी, कालवण अन् रस्सा; कोल्हापुरातील प्रसिद्ध ‘पांढऱ्या रश्श्याचा’ जाणून घ्या रंजक किस्सा…

View this post on Instagram

A post shared by ???????? & ??????? ?????? (@me_haay_foodie)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून @me_haay_foodie नावाच्या अकाउंटने या पांढऱ्या रश्याचा रेसिपी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत २.२ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.