देशभरात नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेला घरोघरी घट स्थापन करून ९ दिवस मातेच्या नऊ रूपांची विधिवत पूजा केली जाते. यावेळी नऊ दिवस आई भवानीला प्रसाद म्हणून विविध वस्तू अर्पण केल्या जातात. जर तुम्हालाही आईला प्रसन्न करण्यासाठी प्रसादासाठी बाजारातील मिठाईऐवजी घरीच मिठाई तयार करायची असेल तर तुम्ही पौष्टीक असा अळीवाचा लाडू घरी तयार करु शकता.

अळीवाचे लाडू साहित्य

१ वाटी अळीव
२ नारळ
अर्धा किलो गूळ
१० बदाम बारीक़ चिरलेले
किंवा जाडसर पूड करून
काजू आवडीनुसार बारीक
किंवा जाडसर पूड करून
२ मोठे चमचे मनुके
१/२ छोटा चमचा वेलची पूड

अळीवाचे लाडू कृती

१. नारळाच्या पाण्यात किंवा १ वाटी दुधात अळीव २ तास भिजत ठेवणे.

२. अळीव भिजल्यावर अळीव, ओले खोबरे व गूळ एकत्र करून मंद आचेवर शिजायला ठेवावे. नीट मिसळले की काजू पूड, बदाम पूड व वेलची पावडर घालून ढवळावे.

३. पूड, बदाम पूड व वेलची पावडर घालून ढवळावे.

४. पाण्याचा अंश आटून खुटखुटीत होईपर्यंत शिजवावे.

हेही वाचा >> नवरात्र विशेष: देवीसाठी हवा रोज खास नैवेद्य, आज करा खास बदामाचा शिरा

५. गोळा झाला की मिश्रण गॅस बंद करावा. मिश्रण थंड होऊ दयावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फूड६. थंड झाल्यावर हव्या त्या आकारात लाडू वळावेत.