Solebhaat Recipe : सध्या राज्यात बाजारांमध्ये तुरीची आवक सुरु झाली. हिवाळ्यात तुरीच्या दाण्याची आमटी, तुरीच्या दाण्याचे कढी गोळे, तुरीच्या दाण्याचा झुणका आवडीने खाल्ला जातो. भाज्यांमध्ये आणि भातामध्ये तुरीचे दाणे टाकून आस्वाद घेतला जातो. तुम्ही कधी सोलेभात खाल्ला आहे का? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सोलेभात म्हणजे नेमके काय? सोलेभात म्हणजे तुरीचे दाणे घालून केलेला मसाले भात. जो विशेषत: हिवाळ्यात तयार केला जातो. तुम्हाला माहितेय का सोलेभात कसा तयार केला जातो? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सोलेभातची रेसिपी सांगितली आहे. ही सोपी रेसिपी पाहून तुम्हीही एकदा हा सोलेभात घरी करून बघाल.

व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

साहित्य

  • तांदूळ
  • खोबरे
  • लसूण
  • मिरची
  • जिरे
  • तुरीचे दाणे
  • मोहरी
  • बारीक चिरलेले कांदे
  • लाल तिखट
  • मीठ
  • हळद
  • गरम मसाला
  • टोमॅटो
  • कोथिंबीर
  • पाणी

हेही वाचा : “तुम्ही मेलात तरी तुम्हाला तीन दिवस आधी कंपनीला सांगावं लागेल”, नेटिझन्सचा संताप; सुट्ट्या रद्द करणारी कंपनीची नोटीस व्हायरल!

कृती

  • सुरुवातीला खोबरे नीट भाजून घ्या. भाजलेले खोबरे बारीक किसून घ्या. खोबऱ्याची पेस्ट तयार होईल
  • त्यानंतर लसूण, मिरची आणि जिरे बारीक वाटून पेस्ट तयार करा.
  • तांदूळ स्वच्छ धुवून घ्या.
  • त्यानंतर एका कढईत तेल गरम करा
  • त्यानंतर त्यात जिरे मोहरी टाका.
  • त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाका. नीट परतून घ्या
  • त्यानंतर भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट आणि लसूण, मिरची आणि जिऱ्याची पेस्ट टाका. नीट परतून घ्या
  • त्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, मीठ आणि गरम मसाले टाका.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेले टोमॅटो टाका.
  • टोमॅटो परतल्यानंतर त्यात स्वच्छ पाण्याने धुतलेले तुरीचे दाणे टाका आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुतलेला तांदूळ टाका.
  • शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
  • तुमचा गरमा गरम सोलेभात म्हणजेच तुरीचे दाणे घालून केलेला मसालेभात तयार होईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : VIDEO: गावातल्या मुलींना शहरातली मुलं जास्त का आवडतात? तरुणींची उत्तर ऐकून कळेल गावच्या पोरांची लग्न का ठरत नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

thawariskitchen या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सोलेभात अर्थात तुरीचे दाणे घालून केलेला मसाले भात” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “याची चव गावाकडची माणसाला चांगलच माहीत आहे” तर एका युजरने लिहिलेय, “सोल्याची भाजी म्हणजे,खेड्यातला लोकांची आवडीची भाजी..” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझी आवडती खिचडी आहे. पाहून तोडला पाणी आले” एक युजर लिहितो, “पाणी सुटलं ना राव तोंडला, अगदी आवडता पदार्थ आहे हा आमचा” तर एक युजर लिहितो, “याला आमच्याकडे दाणेभात म्हणतात” अनेक युजर्सना ही रेसिपी खूप आवडली असून त्यांनी कमेंट्समध्ये हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.