mutton soup recipe in Marathi: रविवार म्हणजे नॉन व्हेज असं समीकरण बहुतांश मराठी घरांमध्ये पाहायला मिळते. काहीजणांकडे तर रविवारी ठरवून नॉन व्हेज खाल्ले जाते. रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे घरामध्ये सर्वजण असतात. अशा वेळी आराम करायच्या दिवशी चमचमीत काहीतरी खायला मिळालं तर किती बरं होईल असं प्रत्येकाला वाटत असते. तुम्हालाही तुमचा रविवार स्पेशल करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक चविष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीचं नाव आहे मटण सूप. चला तर मग जाणून घेऊया चविष्ट आणि पौष्टिक मटण पाया सूप कसा करायचा
मटण सूप रेसिपी साहित्य
- १/२ किलो मटण (चॉप्स लिव्हर वगैरे)
- १ टेबलस्पून आलं-लसूण-मिरची
- १/४ टीस्पून हळद पावडर
- १/२ चमचा कोथिंबीर पेस्ट
- १ टेबलस्पून बारीक चिरलेला कांद
- १/२ वाटी काजू ओलं खोबरं पेस्ट
- ४ लवंगा, ३ दालचिनी, ४ मिरी, २ वेलच्या १ तेजपत्ता
- २ टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार
- १ टेबलस्पून दही
मटण सूप रेसिपी कृती
- कुकरमध्ये २ टेबलस्पून तेल टाकून घ्या. गरम झाल्यावर त्यात लवंग, दालचिनी, मिरी, टाकून घ्या व लगेच कांदा टाकून लालसर परता. कांदा परतल्यावर आलंलसूण पेस्ट टाका मिरची कोथिंबीर पेस्ट टाका. मटण धुवून त्याल हळद, मीठ लावून घ्या व ते कुकरमध्ये टाकून परता. गरम पाणी टाकून शिजू द्या. ३ शिट्ट्या येऊ द्या.
- मटर शिजल्यावर त्यात काजू, ओलं खोबरं पेस्ट टाकून एक उकळी येऊ द्या.
- हे सूप गाळणीने गाळून घ्या व पिसेस बाजूला ठेवा. ह्या पिसेसना तिखट, मीठ लावून फ्राय करून सूपबरोबर खायला ठेवा. सूप परत एकदा उकळून गरमागरम सर्व्ह करा.
हेही वाचा – Mutton recipe: वीकेंडला ट्राय करा कोकणी पद्धतीचे झणझणीत मटण; ही घ्या रोसिपी
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
आज नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी होते हे आम्हाला नक्की कळवा.