मोदक हा प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ आहे. अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतात.
आज आम्ही तुम्हाला मोदकाचा एक नवा प्रकार सांगणार आहोत. तुम्ही कधी फळांचे मोदक खाल्ले आहेत का? हे मोदक फळांपासून बनविल्यामुळे शरीरासाठी खूप हेल्दी असतात. फळांचे मोदक जितके हेल्दी आहे तितकेच टेस्टीसुद्धा असते. आज आपण फळांचे मोदक कसे बनवायचे, याविषयी जाणून घेणार आहोत.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
साहित्य –
- एक केळं
- एक चिक्कू
- एक लहान पपई
- एक छोटं सफरचंद
- तांदूळ पिठी
- पाणी, मीठ, गाईचे तूप.
कृती –
- सर्व फळांचे लहान तुकडे करा.
- आवश्यकता असल्यास साखर किंवा गूळ घालून, एकत्र करा.
- तांदळाची उकड काढून, वरील मिश्रण त्यात भरा
- आणि मोदक तयार करा.
- नेहमीप्रमाणे चाळणीत ठेवून, वाफेवर उकडून घ्या.
- वेगळ्याच प्रकारचे पौष्टिक मोदक तय्यार.
(टीप – फळांमध्ये साखर किंवा गूळ घालण्याच्या ऐवजी गरम मोदकावरून अर्धा चमचा गाईच्या तुपासोबत एक चमचा मध घालूनही हे मोदक फार छान लागतात.)