लोणचे हा शब्द ऐकताच तोंडातून पाणी सुटते काहींना कितीही भाज्या असल्या तरी, तोंडी लावण्यासाठी लोणचं लागतेच. लोणचं अनेक प्रकारचे केले जातात. कैरी, मिरची, लिंबू इत्यादी. पण तुम्ही कधी गाजराचं लोणचं खाल्लंय का? नाही ना.. तर मग हीच रेसिपी आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जर आपल्याला गाजराचे गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर, एकदा गाजराचे चटकदार लोणचे करून खा. वाढेल जेवणाची रंगत

चटकदार गाजर लोणचे साहित्य

४०० ग्राम गुलाबी गाजर
३ टेबलस्पून तयार लोणचे मसाला
मीठ चवीनुसार
२ टेबलस्पून तेल
तिखट चवीनुसार
१/४ वाटी लिंबू रस
१/२ टिस्पून हिंग

चटकदार गाजर लोणचे कृती

१. सर्वप्रथम, गाजराचा वरचा भाग किसून घ्या, व गाजर चिरून घ्या. चिरलेले गाजर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यावर चवीनुसार मीठ शिंपडून मिक्स करा.

२. दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात एक चमचा बडीशेप, जिरं, आणि मेथी दाणे घालून पावडर तयार करा.

३. एका कढईत २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेलं आलं, मोहरीचे दाणे, अर्धा चमचा हिंग, बारीक चिरलेला गाजर घालून मिक्स करा.

४. २ मिनिटानंतर त्यात एक चमचा लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, वाटलेली पावडर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. २ मिनिटापर्यंत मध्यम आचेवर गाजर शिजवून घ्या.

हेही वाचा >> रात्रीच्या जेवणाचा चमचमीत बेत; रुचकर मऊ आणि लुसलुशीत गाजराचा भात, ‘ही’ घ्या सोपी रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. २ मिनिटानंतर गॅस बंद करा. तयार लोणचं एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. अशाप्रकारे गाजराचं चटकदार लोणचं खाण्यासाठी रेडी