Kandyachi Chutney Recipe : अनेकदा घरात भाजीपाला शिल्लक नसतो, अशावेळी कोणती भाजी करावी, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. तुमच्याबरोबर असं कधी झालं का? जर हो तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण ही बातमी वाचल्यानंतर पुढच्या वेळी तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही. आज आपण एक अशी हटके रेसिपी जाणून घेणार आहोत, जी बनवायला सुद्धा खूप सोपी आहे आणि त्या रेसिपीसाठी कोणत्याही भाजीची आवश्यकता नाही. फक्त चार कांद्यांपासून तुम्ही ही हटके रेसिपीचा आस्वाद घेऊ शकता.

सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे आणि नवनवीन रेसिपीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चार कांद्यापासून स्वादिष्ट भाजी कशी बनवायची, हे सांगितले आहे.

video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Masala Bhakri
Masala Bhakri : मसाला भाकरी कधी खाल्ली का? मुलांच्या डब्यात द्या पौष्टिक मसाला भाकरी, पाहा VIDEO
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Kitchen jugad video Easy Ways to Prevent Onion Rot During Monsoon kitchen tips
Kitchen Jugaad: पेपरवर कांदा ठेवताच कमाल झाली; मोठ्या समस्येवर उपाय, काय ते VIDEO मध्ये पाहाच
breakfast recipe
एक कप गव्हाच्या पिठापासून बनवा हा हटके नाश्ता; ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
Bird video goes viral
VIDEO: ‘आयुष्यभर कितीही पैसा कमवा शेवटी’ पक्ष्याचा हा व्हिडीओ पाहून कळेल पैसा वास्तव आहे, पण यश नव्हे
How To Cook Lal mathachi bhaji Note Down This Home Made Maharashtrian Recipe Note down Recipe Traditional Recipe
पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी बहुगुणी ‘लालमाठची भाजी’ ठरेल उपयोगी; रेसिपी लिहून घ्या अन् आरोग्यदायी फायदेही वाचा

हेही वाचा : फक्त ५ मिनिटांत बनवा ‘चटपटीत मसाला शेंगदाणे’; कोणत्याही वेळी भूक लागल्यावर खाऊ शकता ‘हा’ स्नॅक्स, रेसिपी लिहून घ्या

व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

साहित्य –

 • कांदे
 • तेल
 • जिरे
 • हळद
 • मीठ
 • लाल तिखट
 • कोथिंबीर

कृती –

 • सुरूवातीला चार कांदे घ्या.
 • हे कांदे पातळ बारीक कापून घ्या.
 • त्यानंतर गॅसवर कढई ठेवा आणि त्यात तेल गरम करा.
 • गरम तेलामध्ये जिरे टाका.
 • त्यानंतर पातळ बारीक चिरलेला कांदा त्यात टाका.
 • कांदा सारखा परतून घ्या.दोन तीन मिनिटे परतून घ्या
 • त्यानंतर थोडे मीठ टाका. त्यामुळे कांदा चांगला शिजतो.
 • त्यानंतर पुन्हा कांदा परतून घ्या आणि त्यानंतर ४-५ मिनिटे झाकण ठेवा.
 • वाफ आल्यानंतर झाकण काढून घ्या.
 • त्यानंतर त्यात हळद, लाल तिखट आणि जाडसर शेंगदाण्याचे कुट टाका.
 • हे मसाले दोन तीन मिनिटे परतून घ्या.
 • शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
 • कांद्याची भाजी किंवा चटणी तयार होईल.

हेही वाचा : दुधी भोपळ्याची भाजी म्हटल्यावर मुलं नाक मुरडतात? अशावेळी बनवा दुधीचा चमचमीत ठेपला; पटकन नोट करा साहित्य अन् कृती

पाहा व्हायरल व्हिडीओ

aaichirecipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “घरात भाजी नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा….” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कांद्याची चटणी. जी आम्ही वरण भाता बरोबर नेहमी करतो. पण कांदा बारीक कापायचा.” तर एका युजरने लिहिलेय, “माझी आई पण अशीच काद्याची चटणी बनवायची, सारखी आईच्या हातच्या जेवणाची आठवण येते” आणखी एका युजरने लिहिलेय, “आम्ही करतो पण यात डाळीचे पीठ टाकतो आणि याला कांद्याची भाजी म्हणतो”