Recipe: अनेकांना कारलं, भेंडी, दुधी अशा भाज्या खायचा खूप कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही त्या भाज्यांपासून वेगवेगळे नवीन पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता. जेणेकरून तुम्हाला त्या भाज्यांमधील पोषकतत्वदेखील मिळतील. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दुधीचा ठेपला कसा बनवायचा हे सांगणार आहोत. जाणून घ्या साहित्य आणि कृती…

दुधीचा ठेपला बनवण्यासाठी साहित्य:

१. ३ कप गव्हाचे पीठ
२. १/२ कप दुधी
३. २ चमचा दही
४. १ चमचा हळद
५. ७-८ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
६. ६-७ लसूण पाकळ्या ठेचलेल्या
७. २ चमचे तेल
८. मीठ चवीनुसार

Renuka Shahane talks about periods
“१० व्या वर्षी मासिक पाळी आल्याने शारीरिकदृष्ट्या माझे बालपण…”, रेणुका शहाणेंनी सांगितला अनुभव; म्हणाल्या, “माझ्या वर्गात…”
Malvani style vangyache bharit
असे बनवा अस्सल मालवणी पद्धतीने वांग्याचे भरीत; नोट करा साहित्य आणि कृती
Rava sweet Appe for morning breakfast
सकाळच्या नाश्त्यासाठी खास ‘रव्याचे गोड आप्पे’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
what is sleepwalking and why people walk in sleep
झोपेत चालल्याने इमारतीवरून पडून मुंबईत एकाचा मृत्यू; काय आहे हा आजार? लोक झोपेत का चालतात? तज्ज्ञ काय सांगतात….
Instantly make fluffy coffee at home during monsoons
पावसाळ्यात घरीच झटपट बनवा फ्लफी कॉफी; नोट करा साहित्य आणि कृती…
Drink hot black gram soup
पावसाळ्यात प्या गरमागरम काळ्या हरभऱ्याचे सूप; पटकन नोट करा साहित्य अन् कृती
easy guava halwa at home
घरच्या घरी या सोप्या पद्धतीने बनवा पेरुचा हलवा; लिहून घ्या साहित्य आणि कृती
Loksatta editorial Horrific Murder In Vasai Boyfriend Stabs Girlfriend To Death With Iron Spanner
अग्रलेख: लक्षणाची लक्तरे..

दुधीचा ठेपला बनवण्याची कृती:

हेही वाचा: अवघ्या काही मिनिटांत बनवा चमचमीत ‘सोयाबीन कबाब’; नोट करा साहित्य आणि कृती

१. सर्वात आधी दुधी व्यवस्थित किसून घ्या.

२. त्यानंतर त्यातील पाणी गाळून बाजूला काढा.

३. आता किसलेल्या दुधीमध्ये गव्हाचे पीठ, दही, हळद, हिरव्या मिरच्या, लसूण, तेल, मीठ घालून व्यवस्थित मळून घ्या.

४. आता मळलेल्या पीठाचे समान गोळे करून घ्या आणि गोलाकार ठेपला लाटून घ्या.

५. त्यानंतर नॉन-स्टीक तव्यावर मंद आचेवर सर्व ठेपले तेल न लावता शेकून घ्या.

६. तयार गरमागरम दुधीचे ठेपले पुदीन्याच्या चटणीसह सर्व्ह करा.