Oats Paratha Recipe: अलीकडे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी ओट्सचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. ओट्स हा असा पदार्थ आहे, जो थोडा खाल्ला तरी लगेच पोट भरते. ज्यामुळे आपले वजनही आपोआप नियंत्रणात राहते. ओट्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळते. काही जण ओट्स दुधासोबत खातात, पण सतत तेच तेच खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही ओट्स पराठ्याची सोप्पी रेसिपी नक्की ट्राय करून पाहा…

ओट्स पराठ्यासाठी लागणारे साहित्य :

१. ३ वाटी ओट्स
२. ३ वाटी चण्याचे पीठ
३. २ कांदे (बारीक चिरलेले)
४. २ टोमॅटो (बारीक चिरलेले)
५. ५-६ मिरच्या (बारीक चिरलेल्या)
. चिरलेली कोथिंबीर
७. मीठ (चवीनुसार)
८. तेल आवश्यकतेनुसार

हेही वाचा : रविवारी नाश्त्यात रोजच्या इडलीऐवजी बनवा नाचणीची इडली; पटकन नोट करा सोपी रेसिपी

कृती :

१. सर्वात आधी ओट्स १०-१५ मिनिटांसाठी पाण्यात भिजवून ठेवावे.

२. १०-१५ मिनिटांनंतर एका भांड्यात भिजवलेले ओट्स, चण्याचे पीठ, कांदा, मिरची, टोमॅटो, मीठ मिक्स करा.

३. हे सर्व मिश्रण ५-१० मिनिट व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा.

४. आता गरम पॅनमध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून त्यावर ओट्सचे मिश्रण बेसनाच्या पोळीप्रमाणे व्यवस्थित पसरवून घ्या.

५. काही वेळ एका बाजूने खरपूस भाजल्यानंतर पराठा दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित भाजून घ्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६. दुसऱ्या बाजूनेही पराठा भाजल्यानंतर गरमा-गरम ओट्स पराठा तयार झाला. हा पराठा टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.